आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल कायदा भारतात करु शकतो हल्ला, गुप्तचर संस्थेच्या रडारवर AQIS चीफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ISISला (इस्लामिक स्टेट) विरोध करणारी दहशतवादी संघटना अल कायदा भारतात मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याची तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर संस्थेने देशात देशभरात अलर्ट जारी केला आहे. तसेच अधिकारी 'अल कायदा इन इंडियन सबकॉंन्टीनेंट'च्या (एक्यूआयएस) हलचालींवर लक्ष ठेवून आहेत.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गुप्तचर संस्थेचे अधिकारी एक्यूआयएसचे प्रमुख मौलाना असीम उमरच्या प्रत्येक हलचालींवर लक्ष ठेवून आहेत. यासोबतच पश्चिम बंगालसह इतर राज्यातील सक्रीय होऊ पाहात असलेल्या स्लीपर सेल्सचाही कसून शोध घेतला जात आहे.

लष्कराने आधीच जारी केला आहे अलर्ट...
केंद्रीय गृहमंत्रालयाने पश्चिम बंगालमध्ये दहशतवादी सक्रीय असल्याची भीती वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर बंगालसह देशातील प्रमुख राज्यात अलर्ट जारी करण्‍यात आला आहे. दुसरीकडे, ISIS (इस्लामिक स्टेट) देशातील युवकांना सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. दिल्ली, मुंबई व पुडुचेरीमध्ये फ्रान्सच्या नागरिकांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत.

काय आहे एक्यूआयएस?
अल कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अल कायदा इन इंडियन सबकॉंन्टीनेंट (AQIS) घोषणा केली होती. ही शाखा बांगलादेश, भारताच्या इशान्येकडील राज्यांत सक्रीय झाली आहे. भारतीय वंशाचा मौलाना असीम उमर हा अल कायदा इन इंडियन सबकॉंन्टीनेंटचा (एक्यूआयएस) प्रमुख आहे.

एक्यूआयएसने मे महिन्यात जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख केला होता. 'फ्रॉम फ्रान्स टू बांगलादेश: द डस्ट विल नेवर सेटल डाउन' या शिर्षकाखाली जारी केलेल्या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी यांना 'इस्लाम का दुश्मन' म्हणून संबोधण्यात आले होते.

पश्चिम बंगालची सरकारला जास्त चिंता...
कोलकात्याला लागूनच असलेल्या हावडा शहरात ISISची माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा सर्वाधिक वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हावडा हे देशातील चौथे शहर असे आहे की, इंटरनेटवर लोक ISIS शी संबंधित माहिती सर्च करताना दिसत आहेत.
इंटेलिजेंस ब्यूरोच्या एक सर्व्हेनुसार, हावडामध्ये इंटरनेटवर 16 ते 30 वयोगटातील युवक इंटरनेवर ISIS शी संबंधित माहिती वाचण्यात जास्त रुची घेत आहेत. ISIS अशाच राज्यातमधून युवकांना आपल्या जाळ्यात अडकवून आपले नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता इंटेलिजेंस ब्यूरोने व्यक्त केली आहे.

इंटरनेटवर ISIS शी संबंधित माहिती जाणून घेण्यात श्रीनगर (जम्मू व काश्मीर), गुवाहाटी (आसम) व महाराष्ट्रातील पुण्याजवळील चिंचवडमधील युवक उत्सूक असल्याचे देखील इंटेलिजेंस ब्यूरोने म्हटले आहे.

दरम्यान, इराक व सीरियामध्ये ISIS चा गड मानला जातो. या दोन्ही देशात ISISचे दहशतवादी सर्वात मोठ्या प्रमाणात आहेत. याशिवाय ISIS ने तुर्की, लीबिया व मिस्त्रमध्ये देखील पाय पसरवले आहे. सौदी अरबमध्ये देखील ISIS ने भर्ती सुरु केली आहे.

या देशांमध्ये आहे ISIS चे वर्चस्व...
इराक व सीरिया
ISIS चा सर्वाधिक प्रभाव
लेबनान
ISIS ने ऑगस्ट 2014 मध्ये अरसाल शहरावर ताबा मिळवला होता.
लीबिया
ISIS ने ऑक्टोबर 2014 मध्ये लीबियातील डर्न्सवर ताबा मिळवला होता. फेब्रुवारी 2015 मध्ये ISIS ने त्रिपोलीत 21 खिश्चन नागरिकांची हत्या केली होती तर एप्रिल 2015 मध्ये दोन दूतावासांवर हल्ला केला होता.
सौदी अरब
सीमाई भागातील अरार शहरावर ISIS च्या दहशतवाद्यांनी जोरदार फायरिंग केली.
नाइजेरिया
बोको हरामने ISIS ला पाठिंबा जाहीर केल्याची घोषणा केली आहे.
कुवेत
कुवेत मधील सर्वात मोठी मशिदीवर ISIS ने केलेल्या हल्ल्यात 25 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता.
अफगणिस्तान
ISISचे दहशतवादी तालिबान्यांना वरचढ ठरले आहे. ISIS ने अफगणिस्तानातील एका प्रांतात आपला झेंडा फडकावला आहे.