आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISPs To Supreme Court Can Not Ban Child Porn Sites Without Ruling

देशात पोर्न वेबसाइट्सवर बंदी नाही, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असोसिएशनने हात झटकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पोर्न वेबासाइट्स भारतात ब्लॉक करण्यासाठी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सने (आयएसपी) हात वर केले आहेत. आयएसपीने सुप्रीम कोर्टात म्हटले आहे, की दुरसंचार मंत्रालयाच्या आदेशा शिवाय पोर्न वेबसाइट्सवर बंदी घालता येणार नाही. तसेच. त्यांनी स्पष्ट केले आहे, की अशा साइट्सवर कायदेशीर, व्यवहारिक आणि तांत्रिक दृष्ट्या बंदी घालणे शक्य नाही. तसेच आयएसपीचे म्हणणे आहे, की पोर्न साइट्सवरील आक्षेपार्ह्य साहित्य, मजकूर याला त्यांना जबाबदार धरता येणार नाही. पोर्नोग्राफिक या शब्दाचा अर्थ स्पष्ट नसल्याने त्याची नव्याने व्याख्या करण्याचीही गरज आयएसपीने व्यक्त केली आहे.
भारतातील सर्व पोर्न वेबसाइट्स बंद करण्याची मागणी करणारी जनहित याचिका इंदूर येथील कमलेश वासवानी यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. महिलांवर होणा-या सर्वाधिक गुन्ह्यांना अशा वेबसाइट्स जबाबदार असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, खजुराहो कोणत्या श्रेणीत ?
कायदा काय सांगतो