आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी बैलगाडीतून आणले होते सॅटेलाईट, वर्ल्ड रेकॉर्डपर्यंत असा होता ISROचा प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्यभट्ट हे भारताचे पहिले सॅटेलाइट होते. 19 एप्रिल 1975 ला लाँच करण्यात आले होते. (फाइल) - Divya Marathi
आर्यभट्ट हे भारताचे पहिले सॅटेलाइट होते. 19 एप्रिल 1975 ला लाँच करण्यात आले होते. (फाइल)
नवी दिल्ली - भारताने 1962 मध्ये अंतराळ संशोधनाला सुरुवात केली होती. पण त्यानंतरही अनेक वर्षे इस्रोने अत्यंत मोजक्या सोयीसुविधांमध्ये काम केले. 1981 मध्ये भारताने जेव्हा सहावे सॅटेलाइट अॅप्पल लाँच केले होते, त्यावेळी त्याला पॅलोडपर्यंत नेण्यासाठी बैलगाडीचा वापर करावा लागला होता. दुसरीकडे बुधवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरोने 104 सॅटेलाइट एकत्रितपणे लाँच करत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. 

भारताचा अंतराळ प्रवास 
- इंडियन नॅशनल कमेटी फॉर स्पेस रिसर्च (इन्कोस्पार)ने 1962 मध्ये भारतीय स्पेस प्रोग्रामची सुरुवात केली होती. 
- इन्कोस्पार टाटा इन्स्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चअंतर्गत काम करत होते. 
- नंतर त्याचेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन (इस्रो) झाले. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 ला झाली होती. 

असा झाला प्रवास, 54 वर्षांपूर्वी पहिले लाँचिंग 
- भारताने पहिले रॉकेट 21 नोव्हेंबर 1963 ला लाँच करण्यात आले होते. 
- ते एक नाइक अपाचे रॉकेट होते. ते अमेरिकेकडून घेण्यात आले होते. 
- फक्त लाँचिंगची शक्ती ओळखण्यासाठी ते सोडण्यात आले होते. इ

58 वर्षांपूर्वी पहिले रॉकेट 
- भारतात तयार झालेले पहिले रॉकेट होते रोहिणी-75. 20 नोव्हेंबर 1967 ला ते लाँच करण्यात आले होते. रॉकेट टेक्नॉलॉजी बनवण्याची क्षमता पाहण्यासाठी ते तयार करण्यात आले होते. 

42 वर्षांपूर्वी पहिले सॅटेलाइट 
- आर्यभट्ट भारताचे पहिले सॅटेलाइट होते. ते 19 एप्रिल 1975 ला लाँच करण्यात आले होते. 
- 360 किलो वजनाच्या या सॅटेलाइटला प्राचीन भारताचे अंतराळ अभ्यासक आर्यभट्ट यांचे नाव देण्यात आले होते. 
- आर्यभट्ट ला मॅसेज पोहोचवण्यासाठी एका खूप मोठ्या अँटेनाचा वापर केला जात होता. 

38 वर्षांपूर्वी पहिले रिमोट सेंसिंग सॅटेलाइट 
- 7 जून 1979 ला इस्रोने भास्कर-1 हे दुसरे सॅटेलाइट लाँच केले होते. 
- ते भारताचे पहिले रिमोट सेंसिंग सॅटेलाइट होते. 
- भास्कर-1 ने पाठवलेल्या फोटोंचा वापर जंगल, पाणी आणि समुद्राबाबत माहिती मिळवण्यासाठी केला जात होता. 

24 वर्षांपूर्वी लाँच झाले पहिले PSLV
- पोलर सॅटेलाइट लाँच व्हेइकल (PSLV) हे इस्रोचे पहिले ऑपरेशनल लाँच व्हेइकल आहे. 
- त्याचे पहिले उड्डाण 20 सप्टेंबर 1993 ला झाले होते. मात्र ते यशस्वी होऊ शकले नव्हते. 
- हे इस्रोचे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी लाँच व्हेइकल आहे. 
- PSLV ने आतापर्यंत 39 वेळा उड्डाण घेतले आहे. त्यापैकी 37 पूर्णपणे यशस्वी ठरले आहे. 
जगाच्या नजरेच भरलेल्या तीन कामगिरी 
चांद्रयान-1
- इस्रोने 22 ऑक्टोबर 2008 ला हे लाँच केले होते. त्याने 30 ऑगस्ट 2009 पर्यंत काम केले. 
- त्यामुळे भारत हा चंद्रावर पोहोचणारा सहावा देश बनला. 
- त्यापूर्वी अमेरिका, रशिया, जपान, चीन आणि युरोपने त्यांचे स्पेसक्राफ्ट चंद्रावर पाठवले आहेत. 
मंगळयान-1
- 5 नोव्हेंबर 2013 ला ते लाँच करण्यात आले होते. 
- या ग्रहावर पोहोचणारा भारत हा अमेरिका आणि रशियानंतर तिसरा देश बनला आहे. 
- या मिशनचे वैशिष्ट्य म्हणजे इस्रोने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. 
- त्याशिवाय अमेरिका आणि रशियाबरोबर तुलना करता यासाठी लागलेला खर्च हा अत्यंत कमी होता. 
104 सॅटेलाइट्सचे एकत्र लाँचिंग 
- 15 फेब्रुवारी 2017 ला भारताने एकत्रितपणे 104 सॅटेलाइट्स अंतराळात पाठवत रशियाचा विक्रम मोडीत काढला. 
- रशियाच्या नावावर एकत्रितपणे 37 सॅटेलाइट्स पाठवण्याचा विक्रम होता. 
- त्यापूर्वी भारताने एकावेळी 23 सॅटेलाइट्स अंतराळात पाठवले होते. 
 
इस्रोच्या भविष्यातील योजना 
- इस्रो आगामी काळात सन, व्हीनस, ज्युपिटरवरही पोहोचण्याच्या तयारीत आहे. 
- तसेच चंद्र आणि मंगळावर पुन्हा एकदा यान पाठवण्याची शक्यता आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, इस्रोच्या आजवरच्या प्रवासाचे काही PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...