आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या 30 मिनिटांत 104 उपग्रह पृथ्वीकक्षेत स्थापित, जगभरातील मीडियाने केले कौतुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीहरिकोटा - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी जागतिक विक्रम प्रस्थापित करत इतिहास घडवला. जगात प्रथमच १०४ उपग्रह एका वेळी प्रक्षेपित केले. यापूर्वी भारताच्या नावे २० उपग्रह प्रक्षेपणाची नोंद होती. तर, जागतिक विक्रम रशियाच्या नावे होता. २०१४ मध्ये ३७ उपग्रह रशियाने अंतराळात स्थापित केले होते. विशेष म्हणजे अवघ्या ३० मिनिटांत भारताने हे उपग्रह पृथ्वीकक्षेत स्थापित केले. यात भारताचे ३, अमेरिकेचे ९६ आणि इतर पाच देशांचे प्रत्येकी एक असे उपग्रह होते. कार्टोसॅट टूडीच्या मदतीने  भारताला नकाशांसाठी मदत होईल. शिवाय लष्करालाही याची मदत होऊ शकेल. दरम्यान, जगभरातील मीडिया हाऊसेसने भारताचे कौतुक केले आहे.
 
#द न्यूयॉर्क टाइम्स
- यापूर्वीच्या रेकॉर्डपेक्षा तिपटीने जास्त सॅटेलाईट लॉंच करुन ऑर्बिटमध्ये योग्य पद्धतीने स्थानापन्न करणे एक मोठे आव्हान होते. स्पेस बेस्ड सर्व्हिलंस आणि कम्युनिकेशन क्षेत्रात भारत आता महत्त्वाचा खेळाडू झाला आहे.
- लॉंचिंगमध्ये मोठा धोका होता. 17000 मैल (सुमारे 27358 kmph) स्पिडने जाणारे रॉकेट जरा चुक झाली असती तरी एकमेकांना आदळले असते किंवा भरकटले असते. इस्रोने टेक्नॉलॉजीकल एक्सिलंस सिद्ध केले आहे.
 
#द वॉशिंग्टन पोस्ट
- हे लॉंचिंग इस्रोसाठी मोठे यश आहे. कमी खर्चात यशस्वी मिशन करुन दाखवण्यात हातखंडा आहे हे इस्रोने जगाला दाखवून दिले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रोची किर्ती वाढत आहे.
 
# द गार्डियन, ब्रिटन
- प्रायव्हेट स्पेस मार्केटची गतीने वाढ होत आहे. यात भारत एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. या लॉंचिंगने भारताचे स्थान मजबुत झाले आहे.
- 1980 मध्ये स्वतःचे रॉकेट लॉंच करुन भारत जगातील सहावा देश झाला होता. स्पेस रिसर्चला भारताने आधीच आपली प्रायॉरिटी केली होती.
- भारत सरकारने या वर्षीच्या स्पेस प्रोग्रामसाठी बजेट वाढवले आहे. सोबतच व्हिनसपर्यंत मानवरहीत अंतराळयान पाढविण्याची तयारी सुरु आहे.
180 विदेशी सॅटेलाईट्स लॉंच केले आहे इस्रोने
देश सॅटेलाईट्स
US 114
कॅनडा 11
जर्मनी 10
सिंगापूर 8
UK 6
अल्जीरिया 4
इंडोनेशिया, जापान, स्वित्झर्लंड 3-3 (एकूण 9)
इस्रायल, नेदरलंड, डेन्मार्क, फ्रान्स, ऑस्ट्रिया 2-2 (एकूण 10)
SKorea, बेल्जियम, अर्जेंटीना, इटली, तुर्की, लक्जेमबर्ग, UAE, कजाकिस्तान 1-1 (एकूण 8)
एकूण 180

बजेट : अमेरिकी संस्था नासाच्या वार्षिक बजेटचा अर्धा वाटा इस्रोकडून ४० वर्षांत खर्च

जास्त बजेटच्या १० अंतराळ संस्था
क्रम    संस्था    बजेट (रुपयांत)
१.    नासा, अमेरिका    १.२९ लाख कोटी
२.    रोसकॉस्मॉस, रशिया    ४०५२१ कोटी
३.    ईएसए, युरोप    ३८६६९ कोटी
४.    सीएनईएस,फ्रान्स    १६७५० कोटी
९.    इस्रो, भारत             ९,०९३ कोटी

बचत : अमेरिका, चीन व युरोपपेक्षा ६६ पट स्वस्त लाँचिंग
भारताच्या पीएसलव्ही रॉकेटचे एक प्रक्षेपण जवळपास १०० कोटी रुपयांचे असते. रशियाच्या रॉकेटचे ४५५ कोटी. अमेरिका, चीन व युरोपच्या रॉकेटचे एक उड्डाण ६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
} जपान, जर्मनी, इटली, चीनचे बजेट भारतापेक्षा जास्त आहे. इस्रोमध्ये १६ हजार शास्त्रज्ञ तर नासात १७५००, रशियाकडे २३८०० आहेत.

वाटा : जगात १० वर्षांतील प्रक्षेपणात ३८ % भारतीय वाटा
इस्रोने ४७ वर्षांत २४ देशांचे २२५ उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. अमेरिकेने ७२ वर्षांत १३६९ व रशियाने ८० वर्षात १४९२ उपग्रह सोडले. मात्र, १० वर्षांत जगातील प्रक्षेपणात ३८ % वाटा भारताचा राहिला आहे.
 
 
{ भारतानेे पहिल्या प्रयत्नातच मंगळ मोहीम यशस्वी केली होती. अमेरिका ५ तर रशिया ८ प्रयत्नात यशस्वी झाला. 
{ काउंटडाऊन ५२ ऐवजी २८ तास केले आहे.
{ कार्टोसेट-२ डीने भारताला अर्थ मॅपिंगमध्ये मदत मिळेल, लष्करालाही होईल या उपग्रहाचा फायदा

जगभरातून अभिनंदन
} भारताच्या या कामगिरीचे जगभरातून कौतुक होत आहे. लंडन टाइम्स, गार्डियन, चिनी वृत्तसंस्थांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. 


पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... अमेरिका, चीन आणि युरोपच्या तुलनेत भारत 66 पट स्वस्त

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...