आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MARS MISSION: मंगळयानाने पाठवला मंगळाचा आणखी एक विलोभनिय फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(भारताने पाठवलेल्या मंगळयानाने मंगळाचा एक फोटो पाठवला आहे.)
नवी दिल्ली- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) मंगळाचा आणखी एक विलोभनिय फोटो पाठवला आहे. मंगळाच्या पृष्ठभागापासून सुमारे 66,543 किलोमीटर दूर अंतरावरुन हा फोटो काढण्यात आला आहे. फेसबुक पेजवर इस्रोच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. मंगळाच्या दक्षिणेकडे असलेल्या काळोखात इलिसियम नावाचे छग तयार होत आहे. हा मंगळाच्या पृष्ठभागावरील सर्वांत मोठा ज्वालामुखी असलेला भाग म्हणून ओळखला जातो.
मंगळाच्या कक्षेत दाखल झाल्यानंतर मंगळयानाने ज्वालामुखीचा फोटो पाठवला होता. त्यानंतर मार्स कलर कॅमेऱ्याच्या माध्यमातून उत्तरी गोलार्धातील धुळीच्या वादळी गतीविधीचा फोटो पाठवला होता. हा फोटो मंगळाच्या पृष्ठभागापासून सुमारे 74,500 किलोमीटर उंचावरुन घेण्यात आला होता. इस्रोचे चेअरमन डॉ. के. राधाकृष्णन यांनी मंगळाचा हा पहिला फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकी दौऱ्यावर जाण्यापूर्वी दिला होता.
पुढील स्लाईडवर बघा, मंगळयानाने पाठविलेले फोटो...