आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISRO चे नवे जुगाड; आता केरोसीनवर चालणारे रॉकेट इंजिन विकसित करणार, 2021 मध्ये चाचणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
नवी दिल्ली - एका हॉलिवुडपटाच्या बजेटमध्ये मंगळ मोहिम राबवून साऱ्या जगाला आश्चर्याचा धक्का देणारे इस्रो आता नवीन प्रयोग करण्यासाठी सज्ज झाले आहे. सर्व काही सुरळीत झाल्यास 2021 पर्यंत इस्रो आपल्या नवीन सेमी क्रायोजेनिक रॉकेट इंजिनची चाचणी घेणार आहे. हे रॉकेट इंजिन कुठल्या महागड्या फ्यूलवर नव्हे, तर चक्क रिफाईन्ड केरोसीनवर आकाझेप घेऊ शकणार आहे. 
 
इको फ्रेन्डली केरोसीनचा प्रयोग
- सध्या रॉकेटच्या क्रायोजेनिक इंजिनसाठी लिक्वीड हायड्रोजन आणि लिक्वीड ऑक्सिजनचे मिश्रण असलेले घट्ट इंधन वापरले जाते. 
- या इंधनास नेहमी -253 डिग्री सेल्सियस एवढ्या थंड वातावरणात गोठवून ठेवणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे, इस्रोकडून विकसित केले जाणारे इंजिन रिफाईन्ड केरोसीनवर चालणार आहे. त्यास गोठवून ठेवण्याची काहीही गरज नसेल. 
- सामान्य केरोसीनच्या तुलनेत रिफाईन्ड केरोसीन पर्यावरणपूरकही असेल असा दावा केला जात आहे. 
- एवढेच नव्हे, तर अशा प्रकारचे केरोसीन वापरल्यास ते रॉकेट इंधनापेक्षा स्वस्त राहणारच... यासोबतच त्याला गोठवण्याचा खर्च सुद्धा येणार नाही. 
बातम्या आणखी आहेत...