आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रोचे प्रक्षेपित करणार ४ हजार किलो वजनी उपग्रह , जीएसएलव्ही मार्क-३ची डिसेंबरमध्ये चाचणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मंगळ ग्रहापर्यंत धडक मारणा-या भारतीय अवकाश संस्थेपुढे (इस्रो) आता ४ हजार किलोग्रॅम वजनाच्या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याचे लक्ष्य आहे. या दृष्टीने इस्रोची जोरदार तयारी सुरू असून यासाठी जीएसएलव्ही मार्क-३ रॉकेटची येत्या डिसेंबरमध्ये चाचणी घेण्यात येणार आहे.

इस्रोचे प्रमुख के. राधाकृष्णन यांनी मंगळवारी ही माहिती िदली. रॉकेटची चाचणी यशस्वी झाली तर भारत आगामी काळात ४ हजार किलो वजनी उपग्रह सहजपणे अवकाशात पाठवू शकेल. यात शंभर टक्के यश आले तर भारत १२ हजार किलो वजनी उपग्रह अवकाशात स्थापित करू शकण्याची क्षमता असलेल्या जीएसएलव्ही रॉकेटची निर्मिती करू शकेल, असा विश्वास राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

अपयशातून जिद्द
यापूर्वी इस्रोने जीएसएलव्ही मार्क-२ची एप्रिल २०१० मध्ये चाचणी घेतली होती. मात्र क्रायोजेनिक इंजिनमध्ये ऐनवेळी निर्माण झालेल्या बिघाडामुळे ही चाचणी अयशस्वी ठरली होती.
सध्याची स्थिती
५,५०० किलो वजनी उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता चीनकडे
११००० किलो वजनी उपग्रह अवकाशात पाठवण्याची क्षमता युरोपकडे
१०००० किलो वजनी उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता रशियाकडे