आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादसह ५०० शहरांचे इस्रोकडून होणार ‘मॅपिंग’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चांगले नियोजन आणि व्यवस्थापनासाठी मूलभूत आराखडा तयार करता येणे सहज सोपे व्हावे म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) औरंगाबाद, नाशिक, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, अकोल्यासह देशातील ५०० शहरांचे मॅपिंग करणार आहे. त्यासाठी इस्रोने केंद्रीय नगर विकास मंत्रालयाशी करार केला आहे.

झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या स्थानिक स्वराज संस्थांचा बृहत आराखडा तयार करताना नगर रचना विभागाला या मूलभूत आराखड्याची मोठी मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात १ लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांचे मॅपिंग करण्यात येणार असून पुढील महिन्यापासून हे काम सुरू होईल. देशातील २५०० नगर रचनाकारांना या मूलभूत आराखड्याचा वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण देण्यात आले.