आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशाकुमारींनी फेटाळली राजीनाम्याची मागणी, म्हणाल्या, मला सोनिया गांधींचा पूर्ण पाठिंबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भूखंड घोटाळ्यात दोषी ठरल्यावरून निर्माण झालेल्या वादातून पंजाब प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदाचा राजीनामा देण्याची मागणी काँग्रेसच्या सचिव आशाकुमारी यांनी सोमवारी फेटाळून लावली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मला पूर्ण पाठिंबा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस पक्षाने रविवारी आशाकुमारी यांची पंजाब काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्ती केली होती. मात्र, एका भूखंड घोटाळ्यात न्यायालयाने त्यांना एक वर्ष कैदेची शिक्षा सुनावली असल्याची टीका विरोधी पक्षांनी सुरू केली होती. त्या पार्श्वभूमीवर आशाकुमारी यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना आशाकुमारी म्हणाल्या, भाजप, आम आदमी पक्ष आणि शिरोमणी अकाली दल या पक्षांना काँग्रेसची भीती वाटत आहे. त्यामुळेच ते असे आरोप करत आहेत. पण मी राजीनामा देणार नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा मला पूर्ण पाठिंबा आहे. काँग्रेस पक्ष पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळेच भाजप आणि इतर पक्ष घाबरले आहेत.
बातम्या आणखी आहेत...