आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅगी : खटला मागे घेणार नाही, ग्राहक व्यवहार विभागाची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सरकारच्या वतीने मॅगी प्रकरणात नेस्ले इंडियाच्या विरोधातील क्लास अॅक्शन खटला परत घेतला जाणार नसून यावर सुनावणी होणार आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या वतीने ऑगस्ट महिन्यात कंपनीच्या विरोधात राष्ट्रीय ग्राहक विवाद आयोगात ६४० कोटी रुपयांचा खटला दाखल केला होता.

यामध्ये कंपनीवर चुकीच्या पद्धतीने लेबलिंग आणि भ्रामक जाहिराती दाखवण्याचा आरोप करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने आधीच मॅगीवरील बंदी हटवली आहे. त्यानंतर मॅगीची पुन्हा विक्रीदेखील सुरू झाली आहे. त्यानंतर ३५० शहरात ३.३ कोटी मॅगीची पाकिटे विकली गेली.