आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कच्च्या तेलावर लागणार पाच टक्के आयात शुल्क

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्याचा फायदा घेण्याची तयारी सरकारने केली असून कच्च्या तेलावर पाच टक्के आयात शुल्क लावण्याचा सरकार विचार करत आहे. या करवाढीमुळे सरकारच्या तिजोरीत सुमारे १८,००० कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
याआधी जून २०११ मध्ये कच्च्या तेलावरील आयात शुल्क रद्द करण्यात आले होते. कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलर प्रति बॅरलवर गेल्यावर हा निर्णय घेण्यात आला होता. आता पुन्हा कच्च्या तेलाचे भाव कमी झाले असून सुमारे ३० डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत. त्यामुळे पुन्हा पाच टक्के आयात शुल्क लावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अर्थसंकल्पातप्रस्ताव :देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होता सरकारचा महसूल कसा वाढेल यावर केंद्र सरकारच्या वतीने विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात महसुलात वाढ करण्यासाठी कच्च्या तेलावर अायात शुल्क लावण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येऊ शकतो.

पेट्रोलच्या किमतीवर परिणाम :सध्या भारतात आयात होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवर २.५ टक्के आयात शुल्क लावण्यात येते. या माध्यमातून देशातील रिफायनरी उद्योगाला संरक्षण मिळते. मात्र, आता २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात आयात शुल्क लावल्यास या पेट्रोल-डिझेलवरील शुल्क २.५ टक्क्यांवरून वाढून ७.५ टक्के होईल.