आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायपीएल- 6: स्पॉट फिक्सिंगमध्ये पुरावे कमी पडले, श्री पुन्हा संत, सर्व जण निर्दोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आयपीएल-६ स्पॉट फिक्सिंगमध्ये दिल्ली पोलिस आरोपींना शिक्षा तर देऊ शकले नाहीतच; परंतु त्यांचा दोन वर्षांचा तपासच संशयास्पद ठरला आहे. न्यायालयाने शनिवारी पुरा‌व्याअभावी श्रीसंत, अंकित चव्हाण व अजित चंदिलासह ३६ आरोपींना दोषमुक्त केले. पोलिसांचे ६००० पानांचे आरोपपत्र कुचकामी ठरले.

विशेष म्हणजे न्यायमूर्ती नीना बन्सल-कृष्णा यांच्या न्यायालयात आरोप निश्चित करण्यासाठी युक्तिवाद होता. २३ मे रोजी निर्णय राखून ठेवला होता. आरोप निश्चित होतील अशी पोलिसांची अपेक्षा होती, पण घडले उलटेच. २०१३ मध्ये आयपीएल-६ दरम्यान सट्टेबाजीचा भंडाफोड झाला होता. राजस्थान रॉयल्सचे श्रीसंत, चव्हाण, चंदिलासह ३६ जणांना अटक केली होती. नंतर सर्वांना जामीन मिळाला होता. दाऊद इब्राहिम, छोटा शकीलसह ६ आरोपी फरार आहेत.

श्रीसंत, चंदिला आणि चव्हाण हे स्पॉट फिक्सिंगच्या जाळ्यातून निष्कलंक सुटले अाहेत. दिल्ली कोर्टाने साक्षी-पुराव्यांअभावी त्यांना दोषमुक्त केले. हे खेळाडू आता मोकळा श्वास घेत असले तरी आपल्या यंत्रणेच्या मात्र पायात जणू काही बेड्याच पडलेल्या आहेत. या क्रिकेटपटूंनी स्पॉट फिक्सिंग केलीच असावी, असे म्हणणे शक्य नाही. मात्र, कोर्टाच्या या निकालानंतर एक प्रश्न उपस्थित होतो की, त्यांची वाया गेलेली वर्षे कोण भरून देणार? बीसीसीआय? कोर्ट की यंत्रणा? कुणीही नाही.

जोवर स्वत: खेळाडू कबुली देत नाही तोवर स्पॉट फिक्सिंग सिद्ध केली जाऊ शकत नाही, हेच सत्य आहे. जसे की, कमरेजवळ रुमाल ठेवल्याने श्रीसंतने स्पॉट फिक्सिंग केली, हे कसे सिद्ध करता येईल? कोणताही कॅमेरा वा गुप्तचर यंत्रणा ते सिद्ध करू शकत नाही. पाकिस्तानच्या महंमद आमीरने स्वत:च स्पाॅट फिक्सिंगची कबुली दिली होती. तेव्हा कुठे त्याला शिक्षा झाली.

फुटबॉल, बास्केटबॉल आणि बेसबॉलमध्येही मॅच फिक्सिंग होते, स्पॉट फिक्सिंग नाही. येथे खेळाडूही कमीच पकडले जातात. पण बहुतांश अधिकाऱ्यांवरच गंडांतर येते, कारण सिस्टिम बनवले-बिघडवणे त्यांच्याच हाती असते. खेळाडू तर त्यांच्या हाताचे बाहुले असतात. यामुळेच तर फिफाचे अधिकारी तुरुंगात, तर खेळाडू मुक्त आहेत.

बीसीसीआयने फिक्सिंग रोखण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. मात्र, पुढे फिक्सिंग होईलच की नाही, याची कोणतीही हमी नाही. तिन्ही क्रिकेटपटूंबाबत कोर्ट म्हणाले होते की, पोलिस सबळ पुरावे देऊ शकले नाही. कथित बुकीसोबत केवळ दूरध्वनी संभाषणाच्या आधारावर त्यांना दोषी कसे ठरवले जाऊ शकेल? यामुळे बीसीसीआय आतल्या आत खुश आहे, कारण त्यांचे खेळाडू दोषी सिद्ध झाले नाहीत. तथापि, त्यांच्यावरील बंदी कायम आहे. मात्र, बीसीसीआयमध्ये नवीन शक्ती म्हण्ून उदयास येत असलेल्या सौरव गांगुलीने संकेत दिले आहेत की, बोर्ड तिघांनाही क्लिनचिट देऊ शकतो.

पुढील पाणावर वाचा, ५०० तासांचे रेकॉर्डिंग, ६००० पानांचे आरोपपत्र, तरीही पुरावे ठरले कुचकामी