आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष शिगेलाः लोकसभेत हंगामा; काँग्रेसचे 25 \'गोंधळी\' खासदार निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लोकसभेत गोंधळ घालून कामकाज रोखून धरल्याबद्दल काँग्रेसच्या ४४ पैकी २५ खासदारांना अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सोमवारी पाच दिवसांसाठी निलंबित केले. निलंबित सदस्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी नऊ विरोधी पक्षांंनीही या पाच दिवसांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचणार, अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.

फलक झळकावून आणि घोषणा देऊन सभागृहाच्या कामकाजात सातत्याने, हेतुपूर्वक अडथळे आणल्यामुळे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. सुषमा स्वराज, वसुंधराराजे आणि शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे २५ खासदार सभागृहाच्या हौद्यात उतरले होते. अध्यक्षांनी त्यांची नावे घेऊन त्यांना वारंवार ताकीदही दिली. मात्र गोंधळ सुरूच राहिला. त्यामुळे अध्यक्षांनी नियम ३७४ (अ) जारी करत असल्याचे सांगितले. या नियमानुसार सदस्यांचे पाच दिवस आपोआप निलंबन होते. अध्यक्षांनी ही घोषणा करून लगेच कामकाज तहकूब केले. मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या अनेक सदस्यांनी हौद्यात धरणे धरले होते.
निर्णय योग्यच
सभागृहाचे कामकाज सुरळीत चालावे यासाठीच आपण हा निर्णय घेतला आहे.
सुमित्रा महाजन, अध्यक्ष, लोकसभा

हे तर ‘गुजरात मॉडेल’
विरोधकांना निलंबित करून सरकार ‘गुजरात मॉडेल’ची अंमलबजावणी करत आहे.
- मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते
‘एक संधी द्या’
खासदारांना निलंबित करू नका, ते अनुभवी राजकीय नेते आहेत. त्यामुळे भांडणाऱ्या पक्षांना वाद सोडवण्यासाठी एक संधी द्यावी, असे आवाहन तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय यांनी केले.

डावे पक्षही हौद्यात : डाव्या पक्षांचेही काही सदस्य हौद्यात उतरले होते, पण त्यांनी फलक झळकवले नाहीत.

राजीनाम्यांची गरज नाहीच
सुषमा स्वराज तसेच दोन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एफआयआर नाही, न्यायालयाचे ताशेरेही नाहीत, तसेच प्रथमदर्शनी गुन्हाही नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही. - राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री
पुढील स्लाइड्सवर पाहा, संसदेतील महानाट्य
बातम्या आणखी आहेत...