आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानातील फवारणीवर आक्षेप; प्रवासी असताना कीटकनाशक फवारणीवर एनजीटीची मनाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- विमानात प्रवासी उपस्थित असताना कीटकनाशकांची फवारणी केली जाऊ नये, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिले आहे. या बाबीकडे लक्ष देण्याचे निर्देश केंद्र सरकारलाही एनजीटीचे अध्यक्ष न्या. स्वतंत्र कुमार यांनी सोमवारी दिले.

अमेरिकेच्या टेक्सासमधील बेलॉर रुग्णालयाच्या प्रायमरी स्ट्रोक सेंटरचे संचालक आणि न्यूरोलॉजिस्ट डॉ. जयकुमार यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हे आदेश देण्यात आले. कीटकनाशक जरी डास मारण्यासाठी वापरात आणले जात असले तरी त्याचा प्रवाशांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होतो. त्यामुळे प्रवासी विमानात बसण्यापूर्वी किंवा उतरल्यानंतर फवारणी केली जावी, असे लवादाने स्पष्ट केले आहे. नागरी उड्डयन विमान मंत्रालय तसेच नागारी उड्डयन महासंचालकांना यासंबंधीचे आदेश जारी करण्याचे आदेशही लवादाने दिले आहे. दरम्यान, स्वतंत्र कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, जगातील जवळपास सर्व विमान कंपन्यांनी कीटकनाशकांची फवारणी करणे बंद केले आहे. फक्त भारतातील विमान सेवा कंपन्या त्यांच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी अशा प्रकारची फवारणी करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...