आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Issues About Controversial Statments, Minister Given Disclosures

वादग्रस्त मुद्द्यांवर मंत्री देणार खुलासे, राममंदिर, दलित आत्महत्या प्रकरणाचा समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार विविध वादग्रस्त मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यात गोहत्याबंदी, हैदराबादेतील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाची आत्महत्या आणि अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीसह अनेक वादग्रस्त मुद्द्यांचा समावेश आहे. ही भूमिका मांडण्याची जबाबदारी ९ मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश अाणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीबाबत केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा आणि भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दिलेल्या वक्तव्यावरून मोदी सरकार सर्वाधिक चिंतित आहे.

निवडणुकांची चिंता
पुढील वर्षी उत्तर प्रदेश व बंगालमध्ये निवडणुका होत असल्यामुळे सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची जबाबदारी महेश शर्मा, थावरचंद गहलोत, किरण रिजिजू, नजमा हेपतुल्ला, मनेका गांधी, चौधरी वीरेंद्र सिंह आणि नितीन गडकरी यांच्यावर साेपवली अाहे.