आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • It Dept. Sends Fresh Questions To Amitabh Bachchan On Panama Papers

पनामा पेपर्स : अमिताभ यांना नवी प्रश्नावली; चार कंपन्यांशी संबंध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पनामा पेपर्स प्रकरणात प्राप्तीकर विभागाने अभिनेते अमिताभ बच्चन यांना नवी प्रश्नावली पाठवली आहे. असे असले तरी पनामा पेपर्समध्ये ज्या कंपन्यांमध्ये त्यांचे नाव त्यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, िवभागाने प्रश्नांचा नवा सेट पाठवला आहे. यामध्ये इंटरनॅशनल कंझोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्च्या(आयसीआयजे) अहवालात नमूद केले की, त्यांचे आर्थिक देवाण-घेवाणीशी संबंधित माहिती मागवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणात पनामाची कंपनी मोसेक फोन्सेकाच्या लिक दस्तऐवजात अमिताभ यांचे चार विदेशी कंपन्यांशी कथित संबंध आहेत आणि त्यात त्यांची भागीदारी असल्याचा दावा करण्यात आला होता. यावर ७३ वर्षीय अमिताभ यांनी म्हटले होते की, भारत सरकारने या मुद्द्यावर चौकशी सुरू केल्याचा मला आनंद आहे. चार कंपन्यांत माझे नाव कसे आले याबाबतची माहिती मी जाणून घेऊ इच्छितो.