आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीतील AXIS बँकेवर छापा: नोटबंदीनंतर ४५० कोटी रुपये डिपॉझिट, १०० कोटींचे ४४ बनावट खाते सापडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एक्सिस बँकेच्या चांदनी चौक ब्रँचमध्ये नोटबंदीनंतर 450 कोटी रुपये जमा केल्याचे उघड झाले आहे. माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी इनकन टॅक्स डिपार्टमेंटच्या टीमने बँकेवर छापा टाकला. कागदपत्र तपासल्यानंतर ४४ बनावट खात्यांची माहितीही समोर आली. यामध्ये 100 कोटी रुपये भरले होते. आता इनकम टॅक्स डिपार्टमेंट या घोटाळ्याबाबतीत बँकेच्या ५ अधिकाऱ्यांची चौकशी करत आहे. एक्सिस बँकेचे दोन मॅनेजर्सना यापूर्वीही अटक झाली होती...

- 5 डिसेंबरला इन्फोर्समेंट डायरेक्‍टोरेटने एक्सिस बँकेच्या दोन मॅनेजर्सना40 कोटी काळ्या पैशाला नव्या नोटांनी बदलल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.
- आरोपी मॅनेजर शोभित आणि विनीत सिन्हा दिल्लीच्या कश्मीरी गेट ब्रँचमध्ये कार्यरत होते. दोघांवर कमीशन आणि सोन्याच्या विटा घेण्याचा आरोप आहे.
- ईडीच्या छाप्यात लखनऊमधून विटा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ईडीने प्रिवेंशन ऑफ मनी लॉंड्रिंग अॅक्ट म्हणजेच पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बँकेने दोघांना सस्पेंड केले आहे.
- नोव्हेंबरमध्ये अॅक्सिस बँकेच्या कश्मीरी गेट ब्रँचसमोर 3.7 कोटी रुपये जुन्या नोटा ताब्यात घेण्यात आल्या होत्या. ईडी याचा तपास करत आहे.
- मोदी सरकारने काळापैसा, भ्रष्टाचार आणि दहशतवादी संघटनांना पैसे पुरवणे थांबवण्यासाठी 8 नोव्हेंबरला 500-1000 च्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
बातम्या आणखी आहेत...