आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"आयटी'त १४% वृद्धी, वेतनवाढ मात्र ७%

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांना या वर्षी सरासरी १०.५% वेतनवाढ मिळण्याची आशा आहे. मात्र, या प्रकरणात भारतीय आयटी उद्योग अन्य उद्योगांत पिछाडीवर दिसत आहेत. अव्वल चार कंपन्या - विप्रो, टीसीएस, इन्फोसिस आणि कॉग्निजेंटने सरासरी ६.५ ते ८ टक्क्यांपर्यंत वेतनवाढ दिली आहे. चांगल्या आयटी कर्मचार्‍यांनाही १० टक्क्यांपर्यंतच वेतनवाढ दिली जात आहे. या कंपन्यांची सरासरी वेतनवाढ १४ टक्क्यांपर्यंत राहिली ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे बँकिंग, वित्त सेवा आणि विमा क्षेत्रात १९% वेतनवाढीची आशा आहे.

या वर्षी बँकिंग व वित्त संस्थांमध्ये १० टक्क्यांपर्यंत वेतनवाढ होईल आणि एफएमसीजीमध्ये वाढ ८ ते १० टक्क्यांपर्यंत राहण्याची आशा आहे. आयटी कंपन्यांच्या प्रमुखांना (सीईओ) ३३ टक्क्यांपर्यंत वाढ दिली जात आहे. विप्रोचे सीईओ टी. के. कुरियन यांना या वर्षी ३३ आणि टीसीएसचे सीईओ एन. चंद्रशेखरन यांचे वेतन १४ टक्क्यांनी वाढले आहे.
बातम्या आणखी आहेत...