आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 256 Districts Hit By Drought, Government Tells SC

३३ कोटी लोकांना दुष्काळाचा फटका, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील १० राज्यांच्या २५६ जिल्ह्यांतील सुमारे ३३ कोटी लोकांना दुष्काळाच्या संकटाचा जबर फटका बसला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात दिली.

सर्वोच्च न्यायालयात सध्या दुष्काळ याचिकेवर सुनावणी सुरू आहे. देशातील जनता दुष्काळाने होरपळत असताना आम्ही डोळे मिटून बसू शकत नाही, असे सांगत दुष्काळी भागात काय उपाययोजना केल्या आहेत, त्याचा तपशील देण्याच्या निर्देशानुसार केंद्र सरकारने मंगळवारी विस्तृत माहिती न्यायालयात सादर केली. मात्र त्या माहितीत गुजरातची आकडेवारी का नाही, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला. चालू आर्थिक वर्षात मनरेगा योजनेसाठी मंजूर केलेल्या ३५०० कोटी रुपयांपैकी १९,५५५ कोटी रुपये दुष्काळग्रस्त राज्यांना देण्यात आले आहेत, असा दावा केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या उत्तरात केला आहे. मनरेगाअंतर्गत दुष्काळग्रस्त भागातील किती लोकांना १५० दिवसांचा रोजगार देण्यात आला याचा सविस्तर तपशील सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले आहेत.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाची पुनर्रचना करण्यास बँकाही तयार आहेत. मात्र थकबाकीदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. गेल्या काही वर्षांपासून कमी पाऊस झाल्यामुळे अनेक राज्यांत दुष्काळ पडला आहे, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, ऑगस्टमध्ये तयारी, जानेवारीत घोषणा करा : काेर्टाने बजावले... मराठवाड्यात अवघा ३ टक्के पाणीसाठा... देशात अनेक भागांत उष्णतेची तीव्र लाट... थेंबा-थेंबाचे व्यवस्थापन करा : नायर