आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • It Is Difficult To Increase 7.5% GDP, Still The Scope Of Reduction In Repo Rates

7.5% विकासदर अशक्य, रेपो रेट्समध्ये कपातीची अजूनही शक्यता - आर्थिक सर्वेक्षण अहवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जीएसटी लागू झाल्याने निर्माण झालेली आव्हाने, कृषि कर्ज माफी यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात 7.5 टक्के विकासदराचे उद्दिष्ट गाठणे शक्य नसल्याची कबुली केंद्र सरकारने दिली आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवालात हे नमुद करण्यात आले आहे. फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात विकासदर 6.75 ते 7.5 राहाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. याशिवाय रेपो रेटमध्ये कपात होण्याचीही शक्यता मावळली आहे. 
 
केंद्र सरकारने शुक्रवारी आर्थिक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार कृषि कर्ज माफी, जीडीपी, आयआयपी, क्रेडिट, महागाईची लाट यामुळे विकासदरावर परिणाम झाला आहे. 
बातम्या आणखी आहेत...