आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • It Is Opposition Versus Speaker Sumitra Mahajan In Lok Sabha For Gadkari Resign Demand

गदारोळ: गडकरींचा राजीनामाच हवा; काँग्रेस, डावे पक्ष बसले अडून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आणि डावे पक्ष अडून बसले आहेत. त्यामुळे संसदेत सलग तिसऱ्या दिवशी गदारोळ झाला.
गडकरींच्या कुटुंबीयांशी संबंधित ‘पूर्ती’ या संस्थेला कर्ज देताना गैरव्यवहार झाल्याने सरकारला १२.७ कोटी रुपयांचा फटका बसला, असा ठपका ‘कॅग’च्या अहवालात ठेवण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप असून ते गडकरींचा राजीनामा मागत आहेत. ‘कॅग’च्या अहवालातील निष्कर्षांची चौकशी करावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत गडकरींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे दीपेंदर हुडा यांनी लोकसभेत केली. त्यावर ‘कुठलाही गैरप्रकार झालाच नाही, असा दावा’संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला. मात्र, समाधान न झाल्याने काँग्रेस आणि डाव्यांनी सभात्याग केला.

काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार घोषणा दिल्याने भोजनाच्या सुटीपूर्वी पाच वेळा राज्यसभेचे कामकाज स्थगित करावे लागले. महत्त्वाची विधेयके मंजूर होऊ द्यायची नसल्यानेच काँग्रेस पक्ष कामकाज चालू देत नाही, असा आरोप अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला.