आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • It May Be True Of Asimanand Statement, Sushilkumar Shinde Remark

असीमानंद यांचे म्हणणे कदाचित खरेही असेल, शिंदेंची प्रतिक्रिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - समझौता एक्स्प्रेस आणि इतर बॉम्बस्फोटांच्या कारवायांना रा.स्व. संघाच्या वरिष्ठांची मंजुरी होती, या स्वामी असीमानंद यांच्या कथित गौप्यस्फोटावरून देशभर वादंग उठले आहे. असीमानंद यांचे म्हणणे कदाचित खरेही असेल, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तथापि, संघ, भाजप, शिवसेनेने मात्र हे आरोप निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे म्हटले आहे.
असीमानंद यांचे वक्तव्य बघितले जाईल. कदाचित त्यांनी केलेल्या दाव्यात तथ्यही असू शकते, असे शिंदे म्हणाले. गृह मंत्रालयाने या प्रकरणी चौकशी करायला हवी, असे केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला म्हणाले. केंद्राने प्रकरण किरकोळ समजू नये, असे मायावती यांनी म्हटले आहे.
रा. स्व. संघाचे राम माधव यांनी मात्र हा दावा निरर्थक असल्याचे म्हटले आहे. समझौता एक्स्प्रेस, मक्का मशीद व अजमेर शरीफ येथील स्फोटांसंबंधी असीमानंद यांनी नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत कथित दावा केला आहे.