आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीनंतरच्या 20 हजार आयटी रिटर्नची चौकशी; अनेकांनी उत्पन्न लपवल्याचा संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नोटाबंदीनंतर दाखल केलेल्या २०,५७२ इन्कम टॅक्स रिटर्नची प्राप्तिकर खाते सविस्तर चौकशी करणार आहे. या रिटर्नमध्ये कमाई लपवण्यात आल्याचा संशय आहे. नोटाबंदीआधी आणि नंतर  घोषित उत्पन्नात मोठी तफावत आढळली. 

कर अधिकाऱ्यांनी नोटाबंदीनंतर २३.२२ लाख बँक खात्यांपैकी १७.७३ लाख खाती संशयास्पद असल्याचे म्हटले हाेते.  या खात्यांत ३.८६ लाख कोटी जमा झाले हाेते. १६.९२ लाख खातेधारकांनी प्राप्तिकर खात्याने पाठवलेल्या ऑनलाइन प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. आजवर ३९.५% म्हणजे १३.२८ कोटी पॅनकार्ड हे आधारासोबत लिंक करण्यात आले आहेत. देशात सध्या एकूण ३३ कोटी पॅन आणि ११५ कोटी आधारकार्डधारक आहेत. 
 
अर्थव्यवस्थेवर बोजा : जेटली
पंजाब नॅशनल बँकेच्या कार्यक्रमात अर्थमंत्री जेटली म्हणाले, जास्त रोकड असल्यास वेगळा अार्थिक बोजा पडतो. लाेकांची खर्च करण्याची पद्धत बदलत आहे, हे चांगले आहे. अकस्मात हा बदल होणार नाही. मात्र देश ‘लेस कॅश’ हाेताेय हे स्पष्ट दिसत अाहे. यामुळे बँकांकडे कर्ज देण्यासाठी जास्त रक्कम असेल.’
बातम्या आणखी आहेत...