आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीचे राजदूत भारतातून पळण्‍याच्‍या तयारीत, विमानतळांवर अलर्ट जारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- खलाशांच्‍या मुद्यावरुन भारताने इटलीला खडे बोल सुनावल्‍यानंतर दोन्‍ही देशांमध्‍ये संबंध ताणल्‍या गेले आहेत. इटलीच्‍या राजदूत डॅनियल मंचिनी यांना यापुर्वीच सर्वोच्‍च न्‍यायालयाने परवानगीशिवाय देश न सोडण्‍याचे आदेश दिले आहेत. परंतु, मंचिनी पळून जाण्‍याचा प्रयत्‍नात असल्‍याची माहिती आहे. त्‍यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्व विमानतळांवर अलर्ट जारी केला आहे.

मच्‍छीमारांच्‍या मृत्‍यूप्रकरणी भारताच्‍या अटकेत असलेल्‍या खलाशांनी इटलीला मतदानासाठी दिलेल्‍या परवानगीचा गैरफायदा घेतला. त्‍यांनी परत येण्‍यास नकार दिला. हे प्रकरण इटलीने आंतरराष्‍ट्रीय न्‍यायालयात नेण्‍याचे भारताला कळविले. त्‍यामुळे वाद निर्माण झाला आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाने मंचिनो यांना परवानगीशिवाय देश सोडू नका, असे आदेश दिले आहेत. परंतु, एकूणच प्रकरणाचा विचार केल्‍यास माजी परराष्‍ट्र मंत्री एस. एम. कृष्‍णा यांच्‍या निष्‍क्रीयतेमुळे झालेली चूक भारताला महाग पडत असल्‍याचे दिसत आहे. गेल्‍या वर्षी ही घटना घडली होती त्‍यावेळी परराष्‍ट्र मंत्रालयाने या घटनेला द्विपक्षीय संबंधांवर परिणाम घडविणारी नसल्‍याचे सांगून राज्‍य सरकारकडे प्रकरण सोपविले. त्‍याचवेळी हा निर्णय घेतला असता तर वेगळ्या पातळीवर प्रकरण सोडविण्‍यात आले असते. केरळमध्‍ये झालेल्‍या निवडणुकीत खलाशांकडून मच्‍छीमारांच्‍या हत्‍येचे प्रकरण निवडणुकीचा मुद्दा बनविण्‍यात आले होते. त्‍यामुळेच आता इटलीच्‍या सरकारने वेगळी भूमिका घेतली.