आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Italian Fishermen's Case Run In Patiyala House Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इटलीच्या खलाशांचा खटला चालणार पतियाळा हाऊस न्यायालयात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने इटलीच्या खलाशांच्या खटल्याच्या सुनावणीसाठी पतियाळा हाऊस कोर्टाची स्थापना केली आहे. दोन भारतीय मच्छीमारांना ठार केल्याचा या खलाशांवर आरोप आहे.

मुख्य महानगर दंडाधिकारी अमित बन्सल या खटल्याची सुनावणी घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 18 जानेवारी रोजी केंद्र सरकारला या संदर्भात निर्देश दिले होते. केंद्र सरकारने त्यानंतर 23 रोजी उच्च न्यायालयाला विशेष न्यायालय स्थापन करण्यास सांगितले होते. इटलीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यासाठी न्यायालयाने दोन खलाशांना 22 फेब्रुवारी रोजी चार आठवड्यांची मुदत दिली होती. खलाशांनी परत येण्याच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये संबंध ताणलेले असताना 22 रोजी दोघे भारतात दाखल झाले.

हे प्रकरण भारतीय न्यायकक्षेअंतर्गत येत नसल्याची याचिका इटली सरकारने केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली व विशेष न्यायालय स्थापन होईपर्यंत खटला दिल्ली न्यायालयाकडे वर्ग केला. एनरिका लेक्सी जहाजावरील या खलाशांनी गेल्या वर्षी 15 फेब्रुवारी रोजी केरळ किनाºयावर केलेल्या गोळीबारात दोन मच्छीमारांचा मृत्यू झाला होता.