आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीचे राजदूत आज सुप्रीम कोर्टात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय मच्छीमारांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना परत पाठवण्यास तेथील सरकारने नकार दिल्याप्रकरणी सुप्रीम कोर्ट इटलीचे राजदूत डॅनियल मॅनसिनी यांना हजर राहण्याचे आदेश देऊ शकते. मॅसिमिलियानो लातोरे व साल्वातोर गिरोने हे आरोपी असून भारतात परतण्यासाठी सुप्रीम कोर्टाने त्यांना 22 मार्चची मुदत दिली आहे.

मतदानासाठी दोन्ही नौसैनिकांना मायदेशी पाठवताना राजदूत मॅनसिनी यांनी हमी घेतली होती. दरम्यान, मॅनसिनी कोर्टात इटलीची बाजू मांडतील. या प्रकरणी कोर्टाने केद्राचे मतही मागितले आहे. इटली सरकार कोर्टाच्या आदेशाचे पालन करील व ठरलेल्या मुदतीत आरोपी परत येतील, अशी आशा कायदामंत्री अश्विनीकुमार यांनी व्यक्त केली.

राजदुतांना कैद शक्य : कोर्टाच्या अवमानप्रकरणी राजदुतांना कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यांना तुरुंगवासही भोगावा लागू शकतो, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी व्यक्त केले आहे.