आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ITBP Camp Was Evacuated For Rahul Gandhi In Utterakhand

उत्तराखंडः राहुल गांधींसाठी आयटीबीपी कॅम्‍पमधून हलविले जवानांना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली/डेहराडून- उत्तराखंडमध्‍ये बचाव कार्यावरुन राजकारण सुरुच आहे. गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांना परवानगी नाकारल्‍यानंतर राहुल गांधी यांच्‍या दौ-याला परवानगी देण्‍यात आली होती. राहुल गांधींच्‍या दौ-यासाठी गौचर येथील आयटीबीपीचे विश्रांतीगृह रिकामे करण्‍यात आले होते. याठिकाणी बचाव कार्यात गुंतलेले अधिकारी आणि जवान थांबले होते. परंतु, त्‍यांना तिथून हलविण्‍यात आले. त्‍यामुळे कॉंग्रेसने राहुल गांधींबद्दल केलेल्‍या दाव्‍यावरुन प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित करण्‍यात येत आहे.

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्‍या दौ-याबाबत केंद्र सरकारने भेदभाव केल्‍याचा आरोप करण्‍यात येत आहे. त्‍यास उत्तर देताना कॉंग्रेसने दावा केला होता, की राहुल गांधी हे सर्वसामान्‍य व्‍यक्तीप्रमाणे उत्तराखंडमध्‍ये गेले होते. त्‍यांनी कोणतीही व्‍हीआयपी ट्रीटमेंट घेतली नाही. त्‍यातही बचाव कार्याच्‍या अखेरच्‍या टप्प्यात त्‍यांनी दौरा आखला. जेणेकरुन बचाव कार्यात अडथळा निर्माण होणार नाही, असेही कॉंग्रेसने म्‍हटले होते. परंतु, हे दावे पोकळ निघाले आहेत. आयटीबीपीचे महासंचालक अजय चढ्ढा यांनी सांगितले की, राहुल गांधी यांना एसपीजी सुरक्षा मिळाली आहे. त्‍यामुळे आयटीबीपीचे शिबिर त्‍यांच्‍या राहण्‍यासाठी सर्वाधिक सुरक्षित ठिकाण होते. जवानांना कॅम्‍पमधून बाहेर काढण्‍यात आले नाही. त्‍यांना दुसरीकडे हलविण्‍यात आले.

दरम्‍यान, सैन्‍यप्रमुख जनरल बिक्रमसिंग आज गौचर येथे दाखल झाले आहेत. बचाव कार्याचा ते आढावा घेणार आहेत. त्‍यांनी जवानांचे कौतूक केले आहे. जवानांनी प्राणांची पर्वा न करता नागरिकांना वाचविले आहे. बचाव कार्यात 8 हजार जवान गुंतलेले आहेत, अशी माहितीही बिक्रमसिंग यांनी दिली.

सफाई कर्मचार्‍यांच्‍या प्रश्‍नाने राहुल गांधींची दांडी गुल... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये