आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या सीमेवर वेगवान हालचालींसाठी ITBP ला मिळणार SUVs, क्षमतेत होणार वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील वर्षी ITBP ला भारत-चीन सीमेवर पेट्रोलिंगसाठी SUVs देण्यात आल्या. - Divya Marathi
मागील वर्षी ITBP ला भारत-चीन सीमेवर पेट्रोलिंगसाठी SUVs देण्यात आल्या.
नवी दिल्ली- चीनच्या सीमेवर वेगवान हालचालींसाठी ITBP ला  SUVs मिळणार आहेत. त्या सैन्यदलांच्या क्षमतेत वाढ  होणार आहे.  मागील वर्षी ITBP ला भारत-चीन सीमेवर पेट्रोलिंगसाठी  प्रथमच SUVs देण्यात आल्या होत्या. ITBP कडे आता लष्कराप्रमाणे स्वत:ची अत्याधुनिक वाहने असतील. त्यामुळे वेगाने हालचाल करत सैन्याला तैनात करण्यास मदत होणार आहे. गृहमंत्रालयाने उंचावर असणाऱ्या ITBP आऊटपोस्टवर स्नो स्कूटर देण्याचा निर्णयही घेतला आहे. 1962 च्या युध्दानंतर भारत-चीन सीमेवर ITBP ला तैनात करण्यात आले आहे.
 
Q&A च्या माध्यमातून जाणून घ्या निर्णयाविषयी

प्रश्न- होम मिनिस्ट्रीने का घेतला निर्णय?
उत्तर- डोकलाम मधील तणावानंतर भारताकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. या निर्णयामुळे  ITBP ला वेगवान हालचाली आणि तैनातीसाठी मदत होणार आहे.
- गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर सांगितले की, लष्कराकडे स्वत:ची मॅकेनाइज्ड इन्फेंट्री आहे. सीमेवर तैनात असणाऱ्या फौजेकडेही स्वत:ची यंत्रणा आणि वाहने असणे गरजेचे आहे. युध्दाची स्थिती उद्भवल्यास त्याचा सर्वप्रथम सामना ITBP ला करावा लागणार आहे. 
 
प्रश्न- ITBP च्या नव्या ताफ्यात काय असेल?
उत्तर- अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात 250 स्पोर्ट यूटिलिटी व्हीकल (SUV), ऑल टेरेन व्हीकल्स (ATVs), स्नो स्कूटर, बर्फ हटविण्यासाठी एक्सक्वेटर्स, काही मध्यम आकाराच्या फोर व्हीलर्सचा समावेश असेल.
 
प्रश्न- मारा करण्याच्या क्षमतेत कशी वाढ होईल?
उत्तर- 81mm मोर्टार सारख्या सहाय्यक हत्यारांचे अत्याधुनिकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे मारक क्षमतेत वाढ होईल. चीन सीमेवर रस्त्यांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यात येतील. 
 
प्रश्न- दुर्गम भागात कशा पध्दतीने लक्ष ठेवणार?
उत्तर- ITBP ला मागील वर्षी  72 SUVs  देण्यात आल्या. त्याद्वारे दुर्गम भागात पेट्रोलिंग करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त 5 स्नो स्कुटरही देण्यात आल्या आहेत.  
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...