आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Its Not Well To Remove Political Documentation Google

जगभरातून राजकीय दस्तऐवज हटवण्याची मागणी चिंताजनक - गुगल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारच्या विरोधात असलेला मजकूर हटवण्यासाठी सातत्याने दबाव येत आहे. जगभरात सर्वच देशांत हे चित्र आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे, असा गौप्यस्फोट सर्च इंजिन गुगलने केला आहे.मूळच्या अमेरिकेतील या कंपनीकडून सर्चिंग, ई-मेल, जाहिराती, नकाशा इत्यादी सेवा पुरवली जाते. गेल्या चार वर्षांपासून सर्व देशांतील सरकारांनी राजकीय स्वरूपाचा मजकूर वगळण्यासाठी आग्रह धरला आहे.
कंपनीकडे दररोज अशा स्वरूपाची विनंती केली जात आहे. पोलिसांना त्यांच्यावर टीका करणारे विशिष्ट व्हिडिओ किंवा ब्लॉग्ज नकोत. स्थानिक स्वराज्य संस्थांनादेखील आपली कार्यप्रणाली आणि निर्णय प्रक्रिया लोकांना समजू नये, असे वाटते. त्यामुळे तेदेखील आमच्याकडे मजकूर वगळण्यासाठी पाठपुरावा करू लागले आहेत, असे गुगलचे कायदेविषयक विभागाचे संचालक सुझान इन्फानटिनो यांनी स्पष्ट केले.
विविध देश : हजारो मागण्या
जानेवारी ते जूनदरम्यान विविध देशांकडून गुगलला मिळालेल्या सूचनांची संख्या काही हजारांमध्ये आहे. सहा महिन्यांत कंपनीकडे 3 हजार 846 एवढ्या रिक्वेस्ट मिळाल्या होत्या. या देशांनी 24 हजार 737 दस्तऐवज वगळण्याची विनंती केली होती. 2012 मध्ये हा आकडा 68 टक्क्यांनी वाढला.