आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राेहित वेमुला अनुसूचित जातीचाच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मानसिक छळ केल्यावरून हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी राेहित वेमुला याने अात्महत्या केली. विराेधकांनी राेहित हा दलित असल्याचे प्रकरण लावून धरले हाेते. मात्र, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ताे अाेबीसी असल्याचे म्हटले होते. राष्ट्रीय अनुसूचित जाती अायाेगाने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र मागविले होते. त्यात राेहित हा अनुसूचित जातीमधील असून त्याच्या जातीचा उल्लेख ‘माला’ असे करण्यात अाला अाहे. अायाेगाने अाता अॅट्राॅसिटीनुसारच हे प्रकरण हाताळले जावे, अशी भूमिका घेतली अाहे.

राेहित वेमुलाने १७ जानेवारी २०१६ रोजी अात्महत्या केली हाेती. त्यानंतर देशभर या प्रकरणावरून आंोदलने झाली होती. या प्रकरणात ज्यांच्यावर दाेषाराेप करण्यात अाले त्यांच्यावर प्राथमिक गुन्ह्याची नाेंद करण्यात अाली अाहे. त्यात केंद्रीय श्रम अाणि राेजगार मंत्री बंडारू दत्तात्रय अाणि हैदराबाद विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू पी. अप्पाराव यांचाही समावेश अाहे. राेहित अनुसूचित जातीमधील नसून इतर मागासवर्गीयांमधील असल्याचे मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी यांनी संसदेत सांगितले हाेते. मात्र, राष्ट्रीय अनुसूचित जाती अायाेगाने हैदराबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून राेहितचे जात प्रमाणपत्र मागवले होते.

राेहित अनुसूचित जातीमधील असल्यामुळे हे प्रकरण अाता अॅट्राॅसिटीनुसारच चालविण्यात यावे अशी भूमिका आयोगाने घेतली आहे. शांत झालेले हे प्रकरण काँग्रेस पुन्हा हाती घेण्याच्या तयारीत अाहे. मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी यांनी चुकीची माहिती दिल्याने त्यांनाही या प्रकरणात कसे अडकवता येईल यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू अाहेत. त्या दृष्टीने पक्षातर्फे चाचपणी सुरू झाली आहे. बंडारू दत्तात्रय अाणि पी. अप्पाराव यांच्यावर अाता अॅट्राॅसिटीनुसार गुन्हा दाखल करण्याचा मार्ग माेकळा झाला असल्याचे मत आयोगाचे अध्यक्ष डाॅ. पुनिया यांनी व्यक्त केले अाहे. या प्रकरणाची याेग्य चाैकशी व्हावी यासाठी अायाेग नजर ठेवून असणार अाहे. केवळ राेहितच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा हाच अामचा उद्देश अाहे, त्यात सरकारने काेणती विधाने केली हाेती याच्याशी संबंध नसल्याचे डाॅ. पुनिया म्हणत आहेत.
बातम्या आणखी आहेत...