आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इवांका ट्रम्प नोव्हेंबरमध्ये भारत दौऱ्यावर, जागतिक उद्योजकता शिखर परिषदेत होणार सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इवांका भारत दौऱ्यावर येणार असल्याचे ट्विट केले. - Divya Marathi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इवांका भारत दौऱ्यावर येणार असल्याचे ट्विट केले.
नवी दिल्ली - डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येत आहे. 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान हैदराबाद येथे होणाऱ्या जागतिक उद्योजकता शिखर परिषदेमध्ये अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहे. मोदी जूनमध्ये अमेरिका दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी इवांकाला या परिषदेला उपस्थित राहाण्याचे निमंत्रण दिले होते. इवांकाने तेव्हाच ट्विट करुन मोदींना निमंत्रणाबद्दल धन्यवाद दिले होते. 
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ट्विट करुन दिली माहिती 
- इवांका भारत भेटीवर येत असून अमेरिकी शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे. 
- ते म्हणाले, 'भारत भेटीवर जाणाऱ्या अमेरिकी शिष्टमंडळाचे नेतृत्व इवांका ट्रम्प करणार आहे. हे शिष्टमंडळ जागतिक पातळीवर महिलांच्या उद्योगशीलतेचे समर्थन करेल.'
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 2010 मध्ये या परिषदेची सुरुवात केली होती. परिषदेचे यंदाचे हे आठवे वर्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखिल या परिषदेला उपस्थित राहाणार आहेत. 
 
इवांका काय म्हणाली
- इवांकाने ट्विट करुन भारत भेटीची उत्सूकता व्यक्त केली आहे. ती म्हणाली, की भारतात होत असलेल्या जागतिक उद्योजकता शिखर परिषदेला अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची संधी मिळणार आहे. याचा अभिमान वाटत आहे. जगभरातील उद्योजकांना भेटण्यासाठी उत्सूक आहे.
बातम्या आणखी आहेत...