आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jabalpur Medical College Dean Found Dead In Hotel Room At Delhi.

व्यापम घोटाळा: जबलपूर मेडिकल कॉलेजच्या डीनचा दिल्लीत संशयास्पद मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- डॉ.अरुण शर्मा)
नवी दिल्ली- मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापम) घोटाळ्याशी संबंधित डॉ. अरुण शर्मा यांचा दिल्लीत संशयास्पद मृत्यू झाला आहे. डॉ. शर्मा हे जबलपूर येथील एमएस मेडिकल कॉलेजचे प्राचार्य होते. कापसहेडामधील आयजीआय एअरपोर्टजवळील हॉटेल उप्पलमध्ये रविवारी सकाळी डॉ. शर्मा यांचा मृतदेह आढळून आला आहे.

व्यापम घोटाळ्याच्या चौकशी समिती डॉ.शर्मा यांचा समावेश होता. दुसरीकडे, व्यापम घोटाळ्याचा पाठपुरावा करणारे पत्रकार अक्षय सिंह यांच्या देखील रविवारी संशयास्पद मृत्यू झालच्याची माहिती मिळाली आहे. क्षय सिंह यांच्या संशयास्पद मृत्यूची एसआयटीकडून चौकशी करण्‍यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिले आहे.

चौकशीसाठी निघाले होते डॉ. अरुण शर्मा
डॉ.शर्मा यांनी शनिवारी हॉटेल उप्पलमध्ये चेक-इन केले होते. रविवारी सकाळी वेटरने डॉ. शर्मा यांच्या रुमचा दरवाजा ठोठावला असता त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. पोलिसांनी दुसर्‍या चावीने रुमचा दरवाजा उघडला असता डॉ.शर्मा यांचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर एकही जखम नाही.

डॉ.अरुण शर्मा अगरतळा मेडिकल कॉलेजची चौकशी करण्यासाठी जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी ते दिल्ली एअरपोर्टजवळील हॉटेलमध्ये थांबले होते. डॉ.शर्मा यांना ह्रदयविकार होता, अशी माहिती त्यांच्या मुलाने दिल्ली पोलिसांना दिली आहे. पोलिसांना डॉ. शर्मा यांच्या रुममधून औषधी आणि विदेशी दारुची बाटली सापडली आहे.
माजी प्राचार्यांचाही झाला आहे मृत्यू
एक वर्षांपूर्वी 4 जुलै 2014 ला जबलपूर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ.डी.के. साकल्ले यांचाही संशयास्पद मृत्यु झाला होता. डॉ.साकल्ले यांचा मृतदेह त्यांच्या घरात जळालेल्या अवस्थेत सापडला होता. डॉ. साकल्ले यांचा मृत्यु कसा झाला, याचा तपास अद्याप लागलेला नाही. डॉ.साकल्ले यांनी व्यापम घोटाळ्यातील सहभागी विद्यार्थ्यांना कॉंलेजमधून तडकाफडकी निलंबित केले होते.

'अबतक 43'
व्यापम घोटाळ्याशी संबंधित रविवारी दोघांचा मृत्यु झाल्याचे समोर आल्याने आतापर्यंत मृत व्यक्त‍िंची अधिकृत संख्या 27 झाली आहे. मात्र, विरोधी पक्षाने ही संख्या 43 सांगितली आहे. या घोटाळ्याची चौकशी सुरु झाल्यानंतर 25 पेक्षा जस्त जणांचा मृत्यु झाला आहे. याता मध्य प्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांच्या मुलाचाही समावेश आहे.

कॉंग्रेसने केली सीबीआय चौकशीची मागणी
कॉंग्रेसचे महासचिव आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी मागणी केली आहे.

काय आहे व्यापम घोटाळा?
मध्य प्रदेशात व्यावसायिक परीक्षा मंडळाने (व्यापम) नोकरभरती केली होती. त्यावेळी सरकारकडून पैसे देऊन नोकऱ्या वाटल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचेही नाव आहे. व्यापम घोटाळा हा मध्यप्रदेशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे सांगण्यात येते.

-सरकारी नोकरीत 1000 बोगस भरती
- मेडिकल कॉलेजमध्ये 514 बोगस भरतीचा आरोप
- भरतीप्रकरणात माजी मंत्री अटकेत
- याप्रकरणात हजारो जणांना अटक झाली