आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅक मा म्हणाले अलिबाबा ही घोडचूक, मी मजेत जगू इच्छितो!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-फेसबुक काढून चूक केली, असे कधी झुकेरबर्ग म्हणेल का? किंवा मायक्रोसाॅफ्ट ही आयुष्यातील चूक होती, असे बिल गेट्स म्हणतील? पण १२.८ लाख कोटींच्या कंपनीचे चेअरमन जॅक मा यांनी मात्र तसे उद्गार काढले आहेत. चीनमधील दुसरे सर्वांत श्रीमंत जॅक म्हणाले, अलिबाबा कंपनी काढणे ही आयुष्यातील सर्वांत मोठी चूक आहे. १.६ लाख कोटी नेटवर्थ असलेले जॅक पुढे म्हणाले, वृद्धापकाळापर्यंत काम करणार नाही.
त्यामुळे निवृत्तीचे नियोजन करतो आहे.मागील महिन्यात जॅक सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकाॅनाॅमिक फाेरममध्ये होते. तेथे प्रश्नोत्तराच्या सत्रात आयुष्यातील सर्वांत मोठी चूक काेणती, यावर ते उत्तरले, अलीबाबा ही माझी सर्वांत मोठी चूक आहे. ही कंपनी माझे आयुष्य एवढे बदलून टाकेल असे कधी वाटलेच नव्हते. मला छोटा-मोठा बिझनेस करायचा होता. पण अलिबाबाचे मोठे होणे माझ्यासाठी अडचणीचे ठरले. दररोज प्रेसिडेंटएवढा मी व्यग्र असतो. तरीही माझ्याकडे कोणतेही अधिकार नाहीत. मला खासगी आयुष्यही उरले नाही. त्यामुळे पुन्हा आयुष्य मिळाले तर मी कधीही असा बिझनेस करणार नाही. मी माझे आयुष्य मजेत जगू इच्छितो.
बातम्या आणखी आहेत...