आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुन रामपाल आणि जॅकी श्रॉफला BJP कडून ऑफर, यूपी-पंजाबमध्ये करणार कँपेन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अर्जुन रामपाल आणि जॅकी श्रॉफ हे दोघे बॉलीवुड अभिनेते भारतीय जनता पक्षाचे इलेक्शन कॅंपेन करणार असल्याची माहिती मिळाली आहे. इतकेच नाही तर दोन्ही अभिनेते भाजपमध्ये प्रवेश करणार अ‍सल्याची मीडियात जोरदार चर्चा आहे.

अर्जुन रामपाल याने मंगळवारी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पक्षाचे सरचिटणिस कैलाश विजयवर्गीय यांची भेट घेतली. मी काही राजकीय पुढारी नाही. भाजपला कशाप्रकारे पाठिंबा देता येईल, हे पाहाण्यासाठी पक्ष कार्यालयात आल्याचे रामपाल याने सांगितले.

जॅकी श्राफही भाजपच्या संपर्कात...
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन रामपाल यांच्या‍ व्यतिरिक्त 59 वर्षीय अभिनेता जॅकी श्रॉफ देखील भाजपच्या वाटेवर आहे. श्राफ यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली आहे. 
- दरम्यान, काही दिवसांपूर्वी म्युझिक कम्पोझर साजिद-वाजिद यांनी भाजपमध्ये एन्ट्री केली होती. 

भाजपसाठी करतील कॅम्पेन..
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन रामपाल आणि जॅकी श्राफ हे दोघे यूपी आणि पंजाब इलेक्शनदरम्यान भाजपचे कॅम्पेन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
- आपण योग्य उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे रामपाल याने सांगितले आहे.

कोणत्या राज्यात कधी निवडणुका? 
- केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, पंजाबसह देशातील पाच राज्यात निवडणुकांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशात 7 टप्प्यात मतदान होईल. 11 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे तर अंतिम टप्प्यात 8 मार्चला मतदान होईल. 
- गोवा-पंजाबमध्ये 4 फेब्रुवारी तर उत्तराखंडमध्ये 15 फेब्रुवारीला मतदान होईल. 
-  मणिपूरमध्ये 4 आणि 8 मार्च अशा दोन टप्प्यात मतदान होईल.
- पाच राज्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीचे निकाल 11 मार्चला जाहीर करण्‍यात येतील.

देशभरात 4033 विधानसभेच्या जागा...
देशभरात विधानसभेच्या एकूण 4033 जागा आहेत. पाच राज्यात एकूण 690 जागा आहेत. याचा अर्थ असा की, देशाच्या एकूण 17% विधानसभा जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे.