आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे दिग्गज नेते जगदंबिका पाल, हास्य कलाकार राजू श्रीवास्तव भाजपमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसचे दिग्गज नेते जगदंबिका पाल आणि समाजावादी पक्षाकडून एनवेळी लोकसभेचे तिकीट कापलेले हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी दोघांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत केले.
जगदंबिका पाल काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये नाराज होते. गेल्या 15 दिवसांपासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. भाजपने त्यांना डुमरियागंज येथून लोकसभेची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले आहे. याच मतदारसंघातून ते 2009 मध्ये विजयी झाले होते.
प्रसिद्ध हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांनी समाजवादी पक्षाच्या सायकलची सवारी नाकारली आहे. सपा नेतृत्वाने त्यांना लोकसभा उमेदवारीचे गांभीर्य नसल्याचे सांगत त्यांचे तिकीट कापले होते. या उलट, श्रीवास्तव यांनी कानपूरमधी स्थानिक नेते सहकार्य करीत नसल्याचे कारण देत तिकीट परत करीत असल्याचे सांगितले होते.
दिव्य मराठी नेटवर्कसोबतच्या खास बातचीतमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे याआधीच सांगितले होते. भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढणार का, या प्रश्नावर निवडणूक लढणे महत्त्वाचे नसल्याचे ते म्हणाले होते. पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, असे ते म्हणाले होते.