आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jagmohan Dalmiya Passes Away Amid Uncertain Future Of Bcci

दालमियांनी कशी वाढवली गंगाजळी, आता BCCIचे काय असेल भविष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (बीसीसीआय) जगमोहन दालमिया यांचे रविवारी रात्री 9.15 वाजता कोलकाता येथे निधन झाल्यानंतर बीसीसीआयच्या भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित झाला आहे. भारतीय क्रिकेट विश्वावर फिक्सिंगचे सावट असताना एन. श्रीनिवासन यांना बाहेर केल्यानंतर दालमिया यांच्याकडे बीसीसीआयची जबाबदारी आली होती, त्यामुळे त्यांचे पुनरागमन चर्चेत राहिले होते. त्याशिवाय 1996 मध्ये त्यांनी स्पॉन्सरशिप आणि टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क मिळवून देऊन बीसीसीआयला मालामाल केले होते. आता प्रश्न उपस्थित होत आहे, की दालमिया यांच्यानंतर 4000 कोटींच्या बीसीसीआयचे व्यवस्थापन कोण सांभाळणार. (येथे वाचा, बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया कालवश, हृदयविकाराच्या झटक्याने निधन )

दालमियांचे योगदान
- दालमिया आणि इंद्रजितसिंग बिंद्रा या जोडीमुळे 1987 चा वर्ल्डकप भारत-पाकिस्तानमध्ये झाला.
- दालमियांच्या इच्छा शक्तीमुळेच 1996 चा वर्ल्डकप भारत-पाकिस्तान-श्रीलंकेत झाला.
- बीसीसीआयचे उत्पन्न फक्त 1.8 कोटी असताना दालमियांनी 1996 मध्ये त्यात भर घालत थेट 80 कोटींवर नेऊन ठेवले.
- 1997 मध्ये आयसीसी अध्यक्षपदी विराजमान होत त्यांनी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी मोडीत काढली.

WHAT NEXT : अॅडहॉक प्रेसिडेंट होणार ? AGM घेणार निर्णय ?

तत्काळ अध्यक्षपदी कोण असणार
दालमियांच्या निधनानंतर बीसीसीआयच्या एखाद्या वरिष्ठ सदस्याची अॅडहॉक प्रेसिडेंटपदी नियुक्ती होऊ शकते. या पदासाठी राजीव शुक्ला आणि अनुराग ठाकूर स्पर्धेत आहेत.

पुढील नियोजन कसे असेल
अॅडहॉक प्रेसिडेंटची निवड झाल्यानंतर हे प्रकरण AGM समोर जाईल. या बैठकीत पुढील अध्यक्षाची निवड कशी करायची याचा निर्णय होईल.
पुन्हा निवडणूक होणार का
बीसीसीआयशी संबंधीत निवडणूक नियम क्रमांक 15 नुसार जर अध्यक्षांचे निधन झाले तर पुढील 15 दिवसांमध्ये स्पेशल जनरल बॉडीची बैठक बोलावून त्यात अध्यक्षाची निवड केली जाईल. यात प्रत्येक विभागाचे सर्व सदस्य एकत्रित निर्णय घेतील. हा अध्यक्ष पुढील निवडणुकीपर्यंत बीसीसीआय प्रमुख असेल. असे झाले तर आगामी निवडणूक 2017 च्या आधी होणार नाही.

शरद पवार स्वतः आणि त्यांची लॉबी काही 'गेम' खेळणार का
शरद पवारांच्या रणनीतीबद्दल आताच काही सांगणे अवघड आहे. दालमियांच्या निवडणुकीवेळीच पवार बीसीसीआयच्या अॅक्टिव्ह पॉलिटिक्समधून बाहेर पडले होते. तर, श्रीनिवासन यांच्यावर सुप्रीम कोर्टाने निवडणूक बंदी लादली आहे. या दोघांच्या लॉबीविषयी बोलायचे झाल्यास पवार समर्थक सदस्य पुढील निवडणुकीच्या स्पर्धेत राहाणार आहे.
EXPERT VIEW : इस्ट झोन ठरवणार कोण अध्यक्ष
क्रीडा विश्लेषक आयाज मेमन यांनी सांगितले, की आता बीसीसीआय अध्यक्षपदाची स्पर्धा खुली झाली आहे. दालमिया इस्ट झोनमधून होते. त्यामुळे अध्यक्षपदावर पहिला दावा याच विभागाचा असेल. मात्र इस्ट झोनमध्ये एकही मोठे नाव नाही. त्यामुळे दुसऱ्या विभागातील सदस्यही या पदावर दावा सांगू शकतात. मात्र त्यासाठी पहिली अट असेल की इस्ट झोनने 'नाहरकत' प्रस्ताव मंजूर करावा. नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत गौतम राय यांना अंतरिम अध्यक्ष नेमले जाऊ शकते. बोर्डाच्या घटनेनुसार अध्यक्ष पद काही कारणास्तव रिक्त झाल्यास त्याच विभागाचा उपाध्यक्ष अध्यक्षपदीची सूत्रे स्विकारेल. जर इस्ट झोनने नाहरकत प्रस्ताव मंजूर केला तर तत्काळ एजीएमची बैठक बोलवावी लागेल. त्यामुळे नव्या अध्यक्षची निवड हा उत्सूकतेचा मुद्दा असणार आहे. कोणालाही सहजा-सहजी हे पद मिळणार नाही. नॉर्थ झोनमधून अनुराग ठाकूर हेच एकमेव उमेदवार असतील असेही काही नाही. त्यांना अनिरुद्ध ठाकूर हे विरोध करण्याची शक्यता आहे.