आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corrupted Women Polition In Jail News In Divya Marathi

जगातील भ्रष्ट राजकारणी महिलांना तुरुंगवास; शिक्षा झालेल्या जयललिता ठरल्या पहिल्या मुख्यमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१८ वर्षे जुन्या भ्रष्टाचार प्रकरणात तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना चार वर्षांचा कारावास आणि १०० कोटींच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. भारतात महिला मुख्यमंत्र्याला प्रथमच कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, जगभरातील अनेक राजकारणी महिलांना भ्रष्टाचारासाठी शिक्षा सुनावली गेली आहे.

रशियासोबतच्या ऊर्जा करारात दोषी
युक्रेनच्या पहिल्या महिला पंतप्रधान युलिया त्यमोशेंको यांच्यावर रशियासोबतच्या ऊर्जा करारात सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप सिद्ध झाला. यासाठी त्यांना दोन वर्षे तुरुंगात काढावी लागली. युक्रेनमधील फादरलँड या पक्षाचे नेतृत्व युलिया यांच्याकडे आहे. सध्या त्या युक्रेनच्या विरोधी पक्षनेत्या असून तुरुंगवासानंतर पुन्हा सक्रिय राजकारणात आहेत.
युलिया त्यमोशेंको, पंतप्रधान युक्रेन
इतर देशांच्या नेत्या
यांना शिक्षा होण्याची शक्यता
सोनिया गांधी : नॅशनल हेराॅल्ड फंडचा दुरुपयोग केल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
ममता बॅनर्जी : शारदा चिट फंडप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकल्या आहेत.

यांना शिक्षा सुनावली ...
माया कोडनानी : गुजरात सरकारमध्ये मंत्री होत्या. दंगली घडवून आणल्याप्रकरणी २८ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या जामिनावर सुटका.
बीबी जागीर कौर : पंजाबच्या माजी मंत्री जागीर या २००० मध्ये स्वत:च्या मुलीच्या हत्येत दोषी सिद्ध झाल्या. सीबीआयच्या िवशेष न्यायालयाने त्यांना ५ वर्षांचा तुरुंगवास सुनावला होता.