आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jain Community Get Minority Status, Centre Government Declared

राहुल गांधींच्या शिफारशीनंतर जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा, केंद्र सरकारची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एकाअर्थी सरकारवरील पकड आणखी मजबूत केली. त्यांच्या शिफारशीनंतर सुमारे 50 लाख लोकसंख्या असलेल्या जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याची घोषणा केंद्र सरकारने सोमवारी केली.
यामुळे जैन समाजाला आता केंद्राच्या विविध कल्याणकारी योजनांचा फायदा होईल. कॅबिनेट बैठकीत याचा निर्णय घेण्यात आला. राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडे हा मुद्दा मांडला होता. तत्पूर्वी, याबाबत एका शिष्टमंडळाने राहुल यांची भेट घेऊन जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा मुद्दा तडीस नेण्याची विनंती केली होती.