आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी निवडणूकीत काँग्रेस विजयी झाल्यास राहुल गांधी पंतप्रधान - विरप्पा मोईली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करुन आघाडी घेतली असली तरी काँग्रेसकडून अद्याप अधिकृतपणे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असणार हे सांगितले जात नाही. मात्र काँग्रेसचे नेते आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईलींनी 2014 च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस आघाडी विजयी झाली तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीच पंतप्रधान होतील असे सांगितले आहे. तर, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी भाजपचे नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रचारातील हवाच काढली आहे. एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले, 2014 च्या लोकसभा निवडणूकीत भाजप पराभूत झाली तर मोदींचा फुगा फुटणार आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जयराम रमेश यांनी काँग्रेसला हत्ती तर, भाजपला लबाड कोल्हा म्हटले. तर, मोदींची तुलना जर्मनीचा हुकुमशाहा हिटलरशी केली आहे.