आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शशी थरूर पाठोपाठ जयराम रमेश यांनीही केली नरेंद्र मोदींची स्तुती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शशी थरूर यांच्या पाठोपाठ आता जयराम रमेश यांनाही नरेंद्र मोदींची स्तुती केली आहे. माजी केंद्रीय मंत्री असलेल्या रमेश यांनी मोदी यांना भारताचे 'रिचर्ड निक्सन' अशी उपमा दिली आहे. काँग्रेसला मात्र त्यांचे हे वक्तव्य आवडलेले दिसत नाही. त्यामुळेच त्यांनी रमेश यांचे त्यांनाच माहीत अशी शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. रमेश यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, 'मोदी अनेक बाबतीत रिचर्ड निक्सन (अमेरिकेचे माजी राष्ट्रपती) ठरू शकतात.

निक्सन यांनी चीनमध्ये अमेरिकेसाठी मार्ग तयार केला होता. त्याचप्रमाणे मोदीही चीन आणि पाकिस्तानच्या बाबतीत भारताचे निक्सन ठरू शकतात असे रमेश यांनी म्हटले आहे. त्यांच्यात (मोदी आणि नवाज शरीफ ) शाल आणि साडीचे आदान प्रदान झाले आहे. मोदी व्यवहारिकदृष्ट्या योग्य वागत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर या बाबतीत टीका करण्याचा प्रश्नच नाही, असेही रमेश म्हणाले आहेत.

याआधी शशी थरूर यांनीही मोदी यांची स्तुती केली होती. 'मोदी 2.0' अशा शब्दांत त्यांनी मोदींचा उल्लेख केला होता. रमेश यांच्या वक्तव्यावर पक्षाचे प्रवक्ते राज बब्बर म्हणाले की, जयराम रमेश हे अत्यंत कुशल राजकारणी आहेत. ते काय म्हणतात आणि काय लिहितात, हे तेच जाणतात. त्यामुळे याबाबतीत तुम्ही रमेश यांच्याकडेच विचारणा करा, अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली.

संघटनेकडे दुर्लक्ष झाले - द्विवेदी
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवासंदर्भात अजूनही नेत्यांचे विश्लेषण सुरुच आहे. सत्तेत असताना पक्षाने संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे होते, असे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता पक्षांत संघटनात्मक निवडणुका घेणे अत्यंत गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.