आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेटली फोन टॅपिंगप्रकरणी आणखी सहा जण ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या फोन कॉलचे विवरण (कॉल डिटेल रेकॉडर्स सीडीआर) प्राप्त केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुरुवारी तीन कर्मचा-यांसह सहा जणांना अटक केली. या प्रकरणात आता एकूण दहा जणांना अटक झाली आहे. सहा आरोपींना न्यायालयात उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
विशेष शाखेने एएसआय गोपाल, हेड कॉन्स्टेबल हरीश, हेर अलोक गुप्ता, सैफी आणि पुनीतव्यतिरिक्त अन्य एका कॉन्स्टेबलला पकडले आहे. प्रकरण जानेवारी महिन्यात उघड झाले होते. सरकार जेटली यांचे फोन टॅप करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याआधीच्या प्रकरणात दिल्ली पोलिस दलातील कॉन्स्टेबल अरविंद डबास आणि तीन खासगी हेर अनुराग, नीरज आणि नितीशला पकडले होते.