आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदी, NIA मुळे काश्मिरात दहशतवाद्यांचे धाबे दणाणले, दगडफेकीच्या घटनाही कमी - जेटली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेटलींनी चीनवर प्रतिक्रिया देणे टाळले. - Divya Marathi
जेटलींनी चीनवर प्रतिक्रिया देणे टाळले.
नवी दिल्ली - काश्मिरातील दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. आपला जीव वाचवण्यासाठी ते पळ काढत आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी असा दावा करताना याचे सर्वस्वी श्रेय नोटबंदी आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्था एनआयएला दिले आहेत. नोटबंदीमुळे दहशतवाद्यांना होणारी फंडिंग थांबली. त्यांना होणारा पैश्यांचा पुरवठा कमी झाला असेही जेटली म्हणाले आहेत. एवढेच नव्हे, तर एनआयएच्या कारवायांमुळे दगडफेकीच्या घटना सुद्धा कमी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

आणखी काय म्हणाले?
- रविवारी येथे आयोजित एका कार्यक्रमात अर्थमंत्रालयासह संरक्षण मंत्रालय सुद्धा सांभाळणारे जेटली यांनी काश्मिरच्या परिस्थितीचा उल्लेख केला. 
- यावेळी जेटली म्हणाले, दहशतवाद्यांचा खात्मा करणे हेच आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आता दहशतवाद्यांवर दबाव वाढत आहे. यासोबतच नोटबंदीमुळे दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. नुकतेच एनआयएने केलेल्या फंडिंग विरुद्धच्या कारवाईला सुद्धा मोठे यश आले असा दावा जेटलींनी केला. 

चीनवर बोलणे जेटलींनी टाळले
कार्यक्रमात त्यांना भारत आणि चीनच्या सिक्कीम वादावर प्रश्न करण्यात आला. मात्र, त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. तरीही आमच्या सैनिकांवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...