आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाची घोषणा करा : जेटली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची लवकरात लवकर घोषणा झाली पाहिजे, असे भाजप नेते अरुण जेटली यांनी शनिवारी इशा-या-इशा-यामध्ये सांगूनच टाकले. पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका एकदम स्पष्ट आहे.

आता हा मुद्दा आपण जितक्या लवकर पुढे नेऊ तितके अधिक फायदेशीर ठरेल. भाजपकडून चांगले नेतृत्व मिळेल अशी आशा लोकांना आहे. त्यामुळेच आमची जबाबदारी अधिक वाढते.

जेटली शनिवारी एका कार्यक्रमात बोलत होते. विषय होता ‘भारत 2020 : आगामी आव्हाने.’ यूपीए सरकारवर हल्ला करताना ते म्हणाले, दोन सत्ताकेंदे्र असल्यामुळे देशात नेतृत्वाचे संकट निर्माण झाले आहे. पुढील निवडणुकीत वंशवाद आणि योग्यता असा मुकाबला पाहावयास मिळेल. देशाचे राजकारण वंशवादावर असावे की योग्यतेवर, यावर देशव्यापी चर्चा झाली पाहिजे.