आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Housing Scam: Supreme Court Grant Bail To NCP Leader Gulabrao Devkar

घरकुल घोटाळ्यातील आरोपी गुलाबराव देवकरांना सशर्त जामीन, जळगाव-धुळ्यात जाण्यात बंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी तथा राष्ट्रवादीचे माजी आमदार गुलाबराव देवकर यांना सुप्रीम कोर्टाने सोमवारी सशर्त जामीन मंजूर केला.

गुलाबराव देवकरांना जळगावसह धुळे शहरात जाण्यास कोर्टाने बंदी घातली आहे. देवकरांना केवळ सुनावणीसाठीच जळगाव आणि धुळ्यात जाण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. इतर वेळी देवकरांना पुण्यात राहाण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश दिले आहेत. देवकर यांना पुण्यात राहून कमिश्नर कार्यालयाला हजेरी लावण्याची सक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती न्यायमूर्ती टी.व्ही.नलवडे यांनी गुलाबराव देवकर यांचा जामीन फेटाळला होता.
दरम्यान जळगाव महापालिकेचे तत्कालिन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घरकुल घोटाळ्यातील भ्रष्टाचारप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. मात्र, तब्बल सहा वर्षे याप्रकरणी कारवाई झाली नव्हती. उपरोक्त गुन्ह्यात 25 एप्रिल 2012 रोजी आरोपपपत्र दाखल झाले. साक्ष नोंदविण्यासाठी आलेल्या देवकरांना 21 मे 2012 रोजी पोलिसांनी अटक केले. त्याच दिवशी विशेष कोर्टाने देवकरांची जामीनावर सुटका झाली. मात्र, 6 ऑगस्ट 2012 रोजी औरंगाबाद खंडपीठाने देवकरांचा जामीन नाकारला. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय कायम ठेवला होता. धुळ्यातील विशेष कोर्टात हे प्रकरण हस्तांतरीत करण्यात आहे.

दुसरीकडे, जळगाव घरकूल घोटाळ्यातील आरोपी माजी गृहनिर्माण मंत्री आणि जळगावचे माजी आमदार सुरेश जैन यांना अजूनही जामीन मिळालेला नाही. विशेष म्हणजे नुकतीच झालेली विधानसभेची निवडणूक जैन आणि देवकर यांनी तुरूंगातून लढवली होती. त्यात दोघांचाही पराभव झाला होता.