आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jamat Ud Dawa Chief Hafiz Muhammad Saeed Plans To Attack India

हाफिज सईद दिल्लीतील दोन हॉटेलला लक्ष्य करण्याची शक्यता, मेट्रो शहरांना अलर्ट जारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानमधील जमात उद दावा प्रमुख हाफिज मोहम्मद सईद भारतावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. जगभरातील जिहादींच्या कारवायांवर नजर ठेवून असलेली 'SITE' या संस्थेने हा खुलासा केला आहे. मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद भारतावर हल्ला करण्याची शक्यता असल्याचे SITE ने म्हटले आहे.
टाइम्स नाऊ ने 'SITE INTEL' च्या हवाल्याने ट्विट केले आहे, की सईद दिल्लीतील दोन मोठी हॉटेल किंवा आग्रा हायवे येथे हल्ला करण्याची शक्यता आहे. गुप्तचर संस्थांनी देखील सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. भारतातील सर्व मेट्रो शहरांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सिडनीतील लिंट कॅपे आणि पेशावरमधील आर्मी स्कूलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची वकृदृष्टी भारतावर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांना सज्ज राहाण्यास सांगण्यात आले आहे.