आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jammu And Kashmir Floods: Struggle For Relief Continues

लष्कराचा दारूगोळा, शस्त्रास्त्रे पुरात बुडाली; जवानांवर दगडफेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू- काश्मीरमध्ये नागरिकांना वाचवण्यासाठी शर्थ करणार्‍या लष्कराचेही पुरात मोठे नुकसान झाले आहे. लष्करी छावण्यांतील शेकडो एके, इनसास एसएलआर रायफली बुडाल्याने निकामी झाल्या. बॉम्ब तसेच हातगोळ्यांचेही हेच हाल आहेत. तरीही लष्कर रोज २० तासांची बचाव मोहीम राबवत आहे.

श्रीनगरजवळ पुरामुळे सीआरपीएफच्या ४०० जवानांना छावणी सोडावी लागली. काही रायफली सर्व्हिसिंग केल्यानंतर दुरुस्त होतील. मात्र, बॉम्ब तसेच हातगोळे निकामी झाले आहेत.

पाकनेत्याचा सलाम : पाकिस्तानमुस्लिम लीगच्या (एन) खासदार आयेशा जावेद पुरामुळे श्रीनगरच्या हॉटेलमध्ये अडकल्या. भारतीय जवानांनी शनिवारी त्यांना हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढले. त्याबद्दल त्यांनी लष्कराला सलाम ठोकला.

पाणी पातळी वाढली : मध्यकाश्मीरमध्ये पूर ओसरत असताना उत्तरेत मात्र अचानक पाणीपातळी वाढली असल्याचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सांगितले.

जवानांवर दगडफेक
खोर्‍यातवायुसेनेची ८० विमाने हेलिकॉप्टर बचावकार्यात आहेत. संतप्त लोकांच्या दगडफेकीमुळे काही विमानांचे नुकसान झाले. लष्कराला एका ठिकाणी हवेत गोळीबारही करावा लागला.

(फोटो : जलप्रलयातही काश्मिरात सीमेवर पहारा देताना भारतीय जवान)