आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jammu And Kashmir Is Integral Part Of India ,referendum Will Not Take

जम्मू-काश्मीर अभिन्न अंग, सार्वमत घेणार नाही- भारताने शरीफ यांची मागणी फेटाळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / संयुक्त राष्ट्रे - जम्मू काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केलेली मागणी भारताने फेटाळून लावली आहे. "जम्मू काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग असून हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. पाकिस्तानने याकडे लक्ष देण्यापेक्षा दहशतवादावरच नियंत्रण मिळवावे', असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी म्हटले आहे.
पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्राचे महासचिव यांच्यासोबतच्या भेटीत मांडलेल्या मुद्यावर रिजिजू पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांनी पाकिस्तानवर जोरदार टीकाही केली. "पाकिस्तान आपल्या भूमीचा दहशतवादासाठी उपयोग करत आहे. त्यांच्या अनेक हालचाली भारतविरोधी आहेत', असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, शरीफ यांनी रविवारी चिरंतन विकासाबाबतच्या भाषणापूर्वी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की मून यांची भेट घेतली होती आणि सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार जम्मू काश्मिरात जनमत चाचणी घेण्याची मागणी केली होती. शिवाय, पाकिस्तान व भारत यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी मदतही मागितली होती. मात्र, हा दोन्ही देशांतील आपसातील मुद्दा असून त्यांनीच चर्चा करावी, असे मून यांनी या वेळी स्पष्ट केले.