आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jammu Handed Over Naveds Custody To The Nia Nia Chief

नावेदला पकडून देणाऱ्यांना पोलिसात नोकरी; शौर्य चक्रासाठीही शिफारस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: विक्रमजि‍त आणि राकेशला सम्मानित करताना जम्मू कश्मीर नॅशनल पँथर्स पार्टीचे अध्यक्ष बलवंत सिंह मनकोटिया. - Divya Marathi
फाइल फोटो: विक्रमजि‍त आणि राकेशला सम्मानित करताना जम्मू कश्मीर नॅशनल पँथर्स पार्टीचे अध्यक्ष बलवंत सिंह मनकोटिया.


नवी दिल्ली - जम्मू-कश्मीरमधील ऊधमपूरमध्‍ये नावेद नावाच्‍या दहशतवाद्याला विक्रमजित आणि राकेश कुमार या दोन तरुणांनी धाडसाने पकडले. त्‍यामुळे जम्मू-कश्मीर पोलिसांनी विक्रमजित आणि राकेश कुमार शर्मा यांची शौर्य पुरस्‍कारासाठी शिफारस केली असून, त्‍यापैकी एकाला पोलिस सेवेतही नोकरी दिली गेली. दुसऱ्यालाही नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्‍यान, NIA (नॅशनल इनव्‍हेस्टिगेशन एजेंसी) चे प्रमुख शरद कुमार आज (बुधवार) जम्‍मूत जाऊन नावेदची चौकशी करणार आहेत.
नोकरीचे आदेशही निघाली
जम्‍मू काश्‍मीर पोलिसांनी विक्रमजित आणि राकेश कुमार यांना पोलिस सेवेच्‍या नियुक्‍तीची अप्वाइंटमेंट ऑर्डरही दिली. या बाबत जम्मू-कश्मीरचे डीआयजी के. राजेंद्र कुमार यांनी सांगितले, राकेश कुमार शर्मा यांना चिर्दी पोलिस ठाण्‍यात कॉन्स्टेबल म्‍हणून नियुक्‍त केले जाईल. तसेच त्‍यांचे मेहुणे असलेल्‍या विक्रमजित यांनाही शैक्षणिक पात्रतेत सूट देत जम्‍मूच्‍या नानकनगर भागात शिपाईपदावर रुजू करून घेतले जाणार आहे. त्‍यासाठी पोलिस मुख्‍यालयात आवश्‍यक प्रक्रियेसाठी पत्र दिले आहे. या दोघांकडे कुठलेही शस्‍त्र नसताना त्‍यांनी मोठ्या धाडसाने दहशतवादी नावेदला जिवंत पकडून दिले.
कुणाला दिले जाते शौर्य चक्र
देशात शांतता प्रस्‍तापित करण्‍यासाठी कृतीशील प्रयत्‍न करणाऱ्याला शौर्य चक्र दिले जाते. ते वीरतेचे प्रतीक आहे. हा पुरस्‍कार सैन्‍य दलाशिवाय सामान्‍य नागरिकांनाही दिला जातो. तो मरणोपरान्त देण्‍याचीही तरतूद आहे. तांब्‍याचे बनवलेले गोलाकार पदक, त्‍याच्‍या मधोमध कोरलेले अशोकचक्र आणि चारही बाजूने कमळ फुलाच्‍या प्रतिमा लावलेल्‍या असतात.
सकाळी 7 वाजता उघडले न्‍यायालय
नावेदला मंगळवारी जम्मूच्‍या कोर्टात हजर केले गेले. न्‍यायालयाने त्‍याला 14 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. यासाठी सकाळी 7 वाजता न्‍यायालया उघडले गेले. आता नावेदला एनआयएकडे सुपूर्द केले गेले.
पुरावे मिळवण्‍याचा प्रयत्‍न
ऊधमपूरमध्‍ये झालेल्‍या हल्‍ल्‍यामध्‍ये लष्‍कर -ए तोयबा आणि पाकिस्तानच्‍या हात आहे का, या बाबतचे पुरावे, या चौकशीतून मिळवले जाणार आहेत. नावेदने सांगितले की, 6 दहशतवादी 2-2 च्‍या ग्रुपने भारतात घुसले आहेत. ते सध्‍या कुठे लपलेले आहेत, याचा तपास केला जात आहे.
दिल्लीतही आणले जाऊ शकते नावेदला
सूत्रांनुसार, एनआयए पुढील तपासासाठी नावेदला दिल्‍लीही आणू शकेल. दरम्‍यान, गरज पडली तर न्‍यायालयाकडे अजून अधिक दिवसाचा रिमांडची मागणी केली जाणार आहे. देशाच्‍या विरोधात युद्ध पुकारने, नियमबाह्य घुसखोरी, शस्‍त्रबंदी कायद्याचे उल्‍लंघन असे गुन्‍हे नावेदवर दाखल केले गेले आहेत.
नावेद देत आहे उलट सुलट माहिती
नावेद हा चौकशी अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्‍यासाठी उलटसुलट माहिती देत आहे. भारतात घुसखोरी कशी केली, या बाबत त्‍याने मुद्दाहून वेगवेळे रूट्स सांगितले आहेत. दरम्‍यान, आपण दशहताद्याचे प्रशिक्षण घेतल्‍याचे त्‍याने कबूल केले आहे. शिवाय जमाद-उद-दावाचे प्रमुख हाफिज सईदचा मुलगा तल्हा हाफिज याला भेटल्‍याची माहिती त्‍याने दिली.