आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

८० टक्के केशर उद्ध्वस्त, सफरचंदाला गि-हाईक नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीदिल्ली - सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने काश्मीरमधील शेती उद्ध्वस्त झाली आहे. देशाच्या अन्य भागातील शेतीवरही परिणाम झाला आहे. भास्करने खरीप पिकाच्या उत्पन्नाविषयी तज्ज्ञ आणि काही संघटनांशी चर्चा केली.

तांदूळ : २० टक्के नुकसान. मात्र, चांगली साठवण असल्यामुळे किमतीत जास्त फरक नाही. पूर्वउत्तर प्रदेश, ओडिशातील मुसळधार पावसामुळे साळीचे नुकसान.

बासमती: १०-१२ टक्के नुकसान आणि या प्रमाणात किमती वाढण्याची शक्यता. सेंट्रलराइस रिसर्च इंस्टिट्यूटचे संचालक डॉ.टी.मोहापात्र यांच्यानुसार चांगल्या बासमतीची लावणी पूर्व उत्तरप्रदेशात केली जाते. तिथे खूप पाऊस झाला आहे. सरकारकडून त्याचा साठाही केला जात नाही.

सोयाबीन: टक्के कमी पेरणी, मात्र उत्पन्न गत वर्षीप्रमाणे होण्याची आशा
सोपाचे प्रवक्ते राजेश अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार या पावसामुळे सोयाबीनला फायदा होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरणी कमी झाले तरी उत्पन्न चांगले होईल.

मूग,उडीद, तूर : ३-५ टक्के होऊ शकते
दाल असोसिएशन राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार या पावसाचा सर्वाधिक फायदा डाळीच्या पिकांना होईल.