आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जन धन’ योजनेची गिनीज विक्रमात नोंद, देशभरात गरिबांची साडेअकरा कोटी बँक खाती उघडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या स्वातंत्र्यदिनी घोषित केलेल्या जन धन योजनेअंतर्गत देशभरातून गरिबांची १० कोटी नवी बँक खाती उघडण्याचे उद्दिष्ट ओलांडले असून आजवर सुमारे साडेअकरा काेटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची दखल घेण्यात आली आहे. या योजनेची २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरवात करण्यात आली होती. २६ जानेवारी २०१५ पर्यंत साडेसात कोटी खाती उघडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

अवघा भारत आता बँकिंग व्यवस्थेमध्ये सहभागी झाला असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी सांगितले. देशभरातील ९९.७४ टक्के लोकांची खाती आता उघडली गेली असल्याची माहिती त्यांनी दिली. सुमारे ९ हजार कोटी रुपये या खात्यांवर जमा झाले असल्याचेही ते पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. गरिबांसाठी असलेल्या विविध योजनांचे लाभ देण्यासाठी या खात्यांचा उपयोग केला जाणार आहे.

मजुरी, एलपीजी सबसिडी खात्यांवर
या योजनेअंतर्गत बँक खात्यांमध्ये मनरेगाची मजुरी व एलपीजी गॅस सबसिडी जमा केली जाणार आहे. मनरेगाअंतर्गत दिल्या जाणा-या मजुरीपोटी सुमारे ३३ हजार कोटी रुपयांचे दरवर्षी वाटप केले जाते.

लाभ काय?
यामुळे योजनांअंतर्गत दिल्या जाणा-या सबसिडीचा तसेच इतर आर्थिक लाभ थेट बँक खात्यावर जमा करता येईल. सबसिडी वाटपातील घोटाळ्यांना आळा बसेल.

१० कोटींवर कार्डवाटप
*९.११ कोटी खाती राष्ट्रीयीकृत बँकांत उघडण्यात आली.
*२.०१ कोटी खाती उघडली गेली देशभरातील ग्रामीण बँकांत.
*६० टक्के खाती ग्रामीण भागातील.
*४० टक्के खाती शहरी भागातून.

पुढे वाचा योजनेचे उद्दीष्‍ट आणि गिनीज रेकॉर्डस् काय म्हण्‍यात आले..